सेक्स रॅकेटसाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉकचा वापर

सोशल मीडियाचा वापर करून उच्चभ्रू वस्तीमध्ये चालवले जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने मंगळवारी केला.

सेक्स रॅकेटसाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉकचा वापर
SHARES

सोशल मीडियाचा वापर करून उच्चभ्रू वस्तीमध्ये चालवले जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने मंगळवारी केला. पोलिसांनी जुहू येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कारवाई करून देहविक्रीसाठी आणलेल्या तीन मुलींची सुटका केली. या कारवाईत दोघांना अटक केली आहे. 

सेक्स रॅकेट चालवणारे तरुणी पसंत करण्यासाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉक, बिंगोसारख्या ॲपचा वापर करीत असल्याचं उघड झालं आहे.  ज्येष्ठ बोहरा उर्फ टोनी मुंबईत सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामध्ये टोनीसह योगेश उर्फ युवी अशोक गेहलोत, सूरज मंडल, राजकुमार आणि रवी मंडल हव्या त्या ठिकाणी तरुणी पोहचवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक रेवले यांच्या पथकाने कारवाई सुरू केली. 

पोलिसांनी ग्राहक म्हणून जयेश टोनी आणि युवी गहेलोत यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार दोघांनी झेड लक्झरी रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये तीन तरुणी पाठविल्या. बनावट ग्राहकासह पोलिसांनी या हॉटेलमध्ये सापळा रचला. यावेळी पोलिसांनी ३ तरूणींची सुटके केली. तर पैसे घेण्यासाठी आलेल्या युवी गहेलोत आणि सूरज मंडल यांना ताब्यात घेतलं.  तरुणी पुरविण्यासाठी वापरली जाणारी कार पोलिसांनी हस्तगत केली. रवी मंडलच्या मालकीच्या १० ते १५ कार असून या सर्व कार तो सेक्स रॅकेटसाठी वापरत असल्याचं उघडकीस आलं आहे. 



हेही वाचा -

मेगाब्लॉकमुळं डोबिवली स्थानकात प्रवाशांचे 'मेगा'हाल

मुंबई-पुणे मार्गवरील 'या' गाड्या पूर्ववत





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा