Advertisement

'लॉ' च्या वेळापत्रकात पुन्हा बदल


'लॉ' च्या वेळापत्रकात पुन्हा बदल
SHARES

मुंबई विद्यापीठात निकाल गोंधळानंतर आता परीक्षा गोंधळाचा तास रंगलेला पाहायला मिळत आहे. कारण येत्या २२ मे रोजी होणारा कॉन्फ्लिट ऑफ लॉ हा पेपर आता १ जून २०१८ ला होणार असून १ जूनला सुरू होणारा बँकिंग लॉ अँड नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट हा पेपर २२ मे ला होणार आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने नुकताच एलएलएम अभ्याक्रमाच्या सेेमिस्टर ६ व सेमिस्टर १० या दोन्ही परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. काही दिवसांपूर्वी एलएलएमच्या सेमिस्टर १ ची परीक्षा वेळापत्रक गोंधळामुळे पुढे ढकलली होती.


त्यामुळेच परीक्षांची अदलाबदली 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, एलएलएमच्या सेमिस्टर ६ व सेमिस्टर १० च्या परीक्षेत फक्त पेपरची अदलाबदल करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेदरम्यान लॉ शाखेचे अनेक विद्यार्थी कंपनी सेक्रेटरीची परीक्षा देत असून ही परीक्षा याच दरम्यान आहे. त्यामुळेच या परीक्षांची अदलाबदली करण्यात आली आहे.


विद्यार्थी संघटनांनी दिलं निवेदन

‘एलएलएम’ सेमिस्टर ६ सेमिस्टर, १० ची परीक्षा आणि कंपनी सेक्रेटरीची परीक्षा एकाच वेळी आल्यानं शेकडो विद्यार्थी अडचणीत आले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी दोन परीक्षा एकत्र येत असल्याबद्दलची निवेदनं परीक्षा विभागाकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठामार्फत देण्यात आलं आहे.


हेही वाचा -

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या - सकल मराठी समाजाची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा