Advertisement

विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ सुरू


विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ सुरू
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने एलएलएम अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर १ च्या एटकेटीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २३ एप्रिलला होणाऱ्या एलएलएम सेमिस्टर १ च्या एटकेटी परीक्षेतील एक पेपर ४ जून २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान एलएलएम सेमिस्टर १ चा एटीकेटीचा एक पेपर आणि सेमिस्टर २ ची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने हा पेपर पुढे ढकल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. हा पेपर ३ ते ६ या वेळेत घेण्यात येणार असून नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


म्हणून वेळापत्रकात बदल केलं

काही दिवसांपूर्वीच एलएलएम अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर १ एटकेटी आणि २च्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी स्टुंडट लॉ कॉउन्सिलला केली होती. तसंच परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एलएलएमचं विद्यार्थी येत्या ५ मे रोजी कलिना विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करणार होते.

संपूर्ण विचार न करता वेळापत्रक प्रसिद्ध करायचं, विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करायचा आणि त्यानंतर त्या वेळापत्रकावर प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन पुन्हा सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करायचं, असा काहीसा प्रकार विद्यापीठ प्रशासन करताना दिसत आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार विद्यापीठाने एलएलएम सेमिस्टर १ एटकेटी आणि २ ची परीक्षेतील एक पेपर एकाच दिवशी येत असल्याने हा पेपर पुढे ढकलला गेला आहे. 

- विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क) परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा