Advertisement

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या - सकल मराठी समाजाची मागणी


मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या - सकल मराठी समाजाची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी सकल मराठी समाजाच्या वतीने करण्यात अाली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून याबाबतच पत्रक पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.


छत्रपती संभाजी महाराजांचेच नाव का?

साहित्यिक, संस्कृत पंडित, १४ भाषा अवगत असणारे तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक, शिक्षक म्हणूनही संभाजी महाराजांचा गाैरव व्हावा, यासाठी विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नावे दिले गेले पाहिजे, असे या पत्रात म्हटलं आहे.


विद्यापीठाचा रंग भगवा

१८ जुलै १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना मिशनरी जाॅन विल्सन यांनी केली. मुंबई विद्यापीठाचा रंग भगवा आहे, मुंबई विद्यापीठाची ओळख ही अार्थिक विद्यापीठ म्हणून आहे, त्याशिवाय विद्यापीठात भारतीयांसोबतच परदेशी विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येत असतात. त्याकाळी शिक्षणबंदी असताना मराठी, हिंदी, संस्कृत, माेडी, कन्नडी, तामिळ, भाेजपुरी असे बहुभाषिक साहित्य अापल्या विचार काैशल्यावर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केलं आहे.


उच्च कोटीची साहित्य संपदा

साहित्य, कला व शिक्षण या जाेरावर माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती मिळू शकते हे साडेतीनशे वर्षापूर्वी शंभूराज्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या बुधभूषण, सातशतक, नखशिखांत, नायिकाभेद अशी उच्च काेटीची मानवी मूल्ये व विचार संपदा निर्माण करुन मानवाला विचार बंधनातून मुक्तीचा मार्ग माेकळा केला होता. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात अाले अाहे.


हेही वाचा -

२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार

डाॅ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा