Night Curfew: मुंबईत रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली राहणार रेस्टॉरंट्स आणि बार

राज्य सरकारनं दिलेल्या आदेशानंतर मुंबईत रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मध्यरात्री ऐवजी रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली राहतील. सरकारच्या आदेशानंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मालकांनी हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स ख्रिसमस आणि नव वर्षात सकाळी ५ वाजेपर्यंत खुली असायची. परंतु, COVID 19 चा धोका पाहता आणि राज्य सरकारनं काढलेली नियमावली लक्षात घेता यंदा शांततेत ख्रिसमस आणि नववर्ष साजरा करण्यात येईल.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, ते रात्री ११.३० पर्यंत संचारबंदी लागू करावी अशी विनंती करत आहेत. तथापि, सरकार या विनंत्यांना मान्यता देईल की नाही हे अस्पष्ट आहे.

लोअर परेल पबमधील व्यवस्थापकानंही अशीच एक समस्या सामायिक केली. “ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळी आमची चांगली कमाई होईल अशी आशा होती. पण आता ती आशा देखील मावळली आहे.”

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, “रात्रीच्या संचारबंदीचा परिणाम प्रामुख्यानं रेस्टॉरंट्स, बार, मॉल्स, नाइटक्लब इत्यादींवर होईल. दुकानंही रात्री १० वाजता बंद करावी लागतील.”


हेही वाचा

रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात

रात्रीच्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कापले 'इतके' चलान

पुढील बातमी
इतर बातम्या