Advertisement

रात्रीच्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कापले 'इतके' चलान

उल्लंघनांमध्ये हेल्मेट घालणे, सीटबेल्ट लावणे, विना परवाना वाहन चालवणं आणि मास्क न घालणं अशांचा समावेश होता.

रात्रीच्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कापले 'इतके' चलान
(File Image)
SHARES

मंगळवारी रात्रीपासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून संचारबंदी लागू करण्यात आली. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरभरात २ हजारांहून अधिक वाहतूक उल्लंघनाची नोंद केली. उल्लंघनांमध्ये हेल्मेट घालणे, सीटबेल्ट लावणे, विना परवाना वाहन चालवणं आणि मास्क न घालणं अशांचा समावेश होता.

राज्य सरकारनं रात्रीच्या वेळी कर्फ्यू जाहीर केल्याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मुंबई पोलिस संपूर्ण शहरभर मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसले. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की, वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केल्यामुळे चालानची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, पोलिसांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, वरळी सीफेस आणि बँडस्टँड अशा जागांवर दक्षता वाढवली आहे. या अंतर्गतच ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यूके, इटली आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारामुळे नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सध्याच्या नियमांचं पालन केल्यास टॅक्सी, कार आणि ऑटो रिक्षांना रात्री चालवण्याची परवानगी आहे. कार्यालय आणि आवश्यक कर्मचारी पूर्वीप्रमाणे काम करतील. कारण प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, मास्क न घालणाऱ्या पब आणि रेस्टॉरंट्समध्येही पालिकेनं एक मोठी मोहीम राबविली आहे. तर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करमाऱ्या क्लब मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत पब आणि नाईटक्लब उघडण्यासाठी सध्याची अंतिम वेळ ११ पर्यंत आहे.

मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहाटे चार वाजेपर्यंत नाईटक्लब कार्यरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याचा परिणाम म्हणून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तर काहिंकडून दंड वसूव केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ४ मोठ्या पब्सवर कारवाई करण्यात आली आहे.



हेही वाचा

गोरेगावच्या वाघेश्वरी मंदिरात लागली आग, अग्निशमन घटनास्थळी दाखल

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा