Advertisement

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

इंग्लंडमध्ये ‘सार्स कोविड २’ या विषाणूचा नवीन प्रकार आढळला आहे.

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम
SHARES

इंग्लंडमध्ये ‘सार्स कोविड २’ या विषाणूचा नवीन प्रकार आढळला आहे. या नव्या व्हायरसचा वेगानं प्रसार होत असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिन्याच्या कालावधीमध्ये युकेमधून मुंबईत आलेल्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच कोरोना विषयक लक्षणे आढळली तर त्वरीत वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलं आहे.

इंग्लंडमधून २५ नोव्हेंबरपासून जे प्रवासी मुंबईत आलेले आहेत, त्यांना पालिका प्रशासनाकडून नियमावली आखून देण्यात आली आहे.

पालिकेच्या सूचना

  • या पालिकेच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा. तसेच फॅमिली डॉक्टर, नजीकचे पालिका दवाखाने, आरोग्य केंद्र यांच्याकडे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
  • कोरोना संसर्गाची शंका दूर करण्यासाठी कोविड १९ चाचणी करुन घ्यावी. तसेच मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. सोबत आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी.
  • कोणतेही लक्षणे, जसे की, ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचेही कोणतेही लक्षण असल्यास घाबरुन जाऊ नये. त्वरीत पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ कडे संपर्क साधून आवश्यक ती माहिती द्यावी. वॉर्ड वॉर रुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करावी.

‘वॉर रुम’ चे दूरध्वनी संपर्क क्रमांक

ए कुलाबा : ०२२-२२७००००७, बी सँडर्हस्ट रोड ०२२-२३७५९०२३, सी काळबादेवी ०२२-२२१९७३३१, डी ग्रँट रोड ०२२-२३८३५००४, ई भायखळा ०२२-२३७९७९०१, एफ/दक्षिण परळ ०२२-२४१७७५०७, एफ/उत्तर माटुंगा ०२२-२४०११३८०, जी/दक्षिण वरळी ०२२-२४२१९५१५, जी/उत्तर दादर ०२२-२४२१०४४१, एच/पूर्व वांद्रे ०२२-२६६३५४००, एच/पश्चिम वांद्रे ०२२-२६४४०१२१, के/पूर्व अंधेरी ०२२-२६८४७०००, के/पश्चिम अंधेरी ०२२-२६२०८३८८, पी/दक्षिण गोरेगाव ०२२-२८७८०००८, पी/उत्तर मालाड ०२२-२८४४०००१, आर/दक्षिण कांदिवली ०२२-२८०५४७८८, आर/उत्तर बोरीवली ०२२-२८९४७३५०, आर/मध्य दहिसर ०२२-२८९४७३६०, एल कुर्ला ०२२-२६५०९९०१, एम/पूर्व चेंबूर ०२२-२५५२६३०१, एम/पश्चिम चेंबूर ०२२-२५२८४०००, एन घाटकोपर ०२२-२१०१०२०१, एस विक्रोळी ०२२-२५९५४०००, टी मुलुंड ०२२-२५६९४०००

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा