रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार-कतरिना कैफ स्टारर फिल्म 'सूर्यवंशी'ची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. रिलीज डेट सांगण्यासाठी 'सिंघम' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगननं चित्रपटाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. अजयनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं आहे की, 'पोलिस येत आहेत! सूर्यवंशी २४ मार्चला रिलीज होईल. पण टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकला अजयची ही पोस्ट काही आवडलेली दिसत नाही.
चंद्रमुखी चौटाला ही प्रसिद्ध व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कविता कौशिकला अजय देवगननं केलेल्या पोस्टवर उत्तर दिलं आहे. एकप्रकारे अजयनं केलेलं वक्तव्य तिला आवडलेलं दिलत नाही. कवितानं अजयला उत्तर देताना लिहिलं आहे की, "आता आम्ही पोलिसांना पसंत करत नाही आणि त्यांच्यावर विश्वासही राहिलेला नाही सर."
'ही' भूमिका लोकप्रिय ठरली
कवितानं पोलिसांवरुन विश्वास उठला असल्याचं भाष्य केलं असंल तरी, छोट्या पडद्यावर तिला पोलिस इंस्पेक्टरच्या भूमिकेतूनच यश मिळालं आहे. कवितानं एफआयआरमध्ये चंद्रमुखी चौटाला नावाच्या कडक पोलिस इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती.
कवितानं २००१ मध्ये टीव्ही सीरियल 'कुटंब'मधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर तिनं 'कहानी घर घर की', 'कुमकुम: एक प्यार सा बंधन' आणि 'पिया का घर' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. परंतु २००६ च्या कॉमेडी शो एफआयआरमध्ये पोलिस इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून तिला ओळख मिळाली. ३१ जुलै २००६ रोजी सुरु झालेला हा शो २३ जानेवारी २०१५ पर्यंत चालू होता.
याशिवाय तिनं काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. कवितानं 'एक हसीना थी', 'मुंबई कटिंग' आणि 'फिल्लम सिटी', 'जंजीर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ३९ वर्षीय कवितानं २०१७ मध्ये तिचा मित्र रोनित बिस्वास याच्याशी लग्न केलं.
हेही वाचा