तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत अभिनेत्री जयललिता यांचं जीवन मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'थलायवी'. आज जयललिता यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
On #Thalaivi 's birth anniversary, here's another glimpse of #KanganaRanaut looking like a mirror image of #Jayalalitha#ThalaiviBirthAnniversary @KanganaTeam #Vijay @vishinduri @ShaaileshRSingh @BrindaPrasad1 @thearvindswami @itsBhushanKumar @KarmaMediaent @TSeries @vibri_media pic.twitter.com/Tpev94ilk4
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) February 24, 2020
आज कंगनानं जयललिता यांच्या जयंती दिवशी ‘थलायवी’मधील तिचा आणखी एक लूक शेअर केला आहे. यामध्ये ती हुबेहूब जयललिता यांच्यासारखी दिसत आहेत. यामध्ये तिनं जयललितांप्रमाणेच लाल-काळ्या काठाची सफेद साडी नेसली आहे. कंगना रणौत टीमनं इन्स्टाग्रामवर जयललिता यांचा जुना फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याच सेम लूकमध्ये कंगनाचा देखील फोटो शेअर केला आहे. जयललिता यांची आज 72 वी जयंती आहे. त्यानिमित्त हे दोन्ही फोटो शेअर करण्यात आले आहेत. कंगनाच्या या फोटोबाबत मात्र प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगनाच्या या हुबेहूब लूकची सर्वांनीच प्रशंसा केली आहे.
‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसली. जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली आहे. तेव्हा पासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. पण पहिलं पोस्टर रिलीज झाल्यावर मात्र सर्वांचीच निराशा झालेली दिसली.
चित्रपटाचं दिग्दर्शक विजय यांनी सांगितलं की, जयललिता यांच्या आयुष्याची कहाणी लाखो लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आज त्यांची जयंती आहे. जयंतिनिमित्त आम्ही कंगना रणौतनं साकारलेली भूमिका त्यांना समर्पित करतो आणि त्यांचा समर्पणासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. विजय दिग्दर्शित आणि विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह निर्मित 'थलायवी' हा चित्रपट जून 2020 मध्ये तामिळ, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल.
अलीकडेच कंगनाच्या 'तेजस' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना रणौत भारतीय हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
कंगना रणौत अखेर अश्विनी अय्यर तिवारीच्या पंगा चित्रपटात दिसली होती. या सिनेमात ती आईच्या भूमिकेत झळकली होती. जी आपली स्वप्नं साध्य करण्यासाठी लग्नाच्या ७ वर्षानंतर कबड्डी क्षेत्रात परतते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा व्यवसाय करण्यात अपयशी ठरला. परंतु कंगनाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. या चित्रपटात कंगनाशिवाय जस्सी गिल आणि रीचा चड्डा देखील मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा