Advertisement

Exclusive Interview : 'मुन्ना'नं मिर्जापूर २ संदर्भात केलं हे वक्तव्य


Exclusive Interview : 'मुन्ना'नं मिर्जापूर २ संदर्भात केलं हे वक्तव्य
SHARES

मिर्झापूरमधील लिक्विड उर्फ मुन्ना म्हणजेच दिव्येंदु श्रमानं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडली आहे. नुकताच त्यांचा 'शुक्राणू' हा वेब चित्रपट झी 5 वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो एका अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारतोय जो लग्नाच्या दोन दिवसानंतरच नसबंदी बळी पडतो. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिव्येंदूनं मुंबई लाइव्हशी खास बातचित केली. या दरम्यान, तो शुक्राणू आणि मिर्जापूर २ बद्दल देखील मुंबई लाइव्हशी गप्पा मारल्या

शुक्राणूतील तुझी भूमिका काय आहे?

चित्रपटातील माझ्या पात्राचं नाव इंदर आहे. दिल्लीत राहणारा हा मुलगा कंपनीत सुपरवायझर असतो. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची त्याच्यात जिद्द असते. त्याच्या आसपास काही चुकिच्या घटना घडत असतील तर तो त्याविरोधात आवाज उठवतो. पण अन्यायाविरोधात आवाज उठवणं त्याला एक दिवस महागात पडतं. जबरदस्ती त्याची नसबंदी करण्यात येते. पण याविषयी तो कुणालाच काही सांगत नाही. गप्प राहून सगळं सहन करण्याचं तो ठरवतो.

शुक्राणू या चित्रपटाची स्क्रिप्ट आपल्यापर्यंत कशी पोहोचली? आणि यात काय विशेष आहे?

झी ५ बरोबर मी यापूर्वी 'बदनाम गली' आणि 'फटाफट' हे लघुपट केले होते. त्यांच्यासोबत काम करण्याचा मला चांगला अनुभव आला. त्या दरम्यान, आणखी एक स्क्रिप्ट आली ती होती शुक्राणू चित्रपटाची. जेव्हा मी 'शुक्राणू' चित्रपटाचं नाव आणि संकल्पना ऐकली, तेव्हा ती मला खूप आवडली

आपण आणीबाणी आणि विशेषत: नसबंदीवर चित्रपट केले नाहीत. याविषयावर आपण जास्त चित्रपट का केले नाहीत? हे माहित नाही. पण मला वाटतं की, जे यातून गेले त्यांच्यावर चित्रपट बनवणं आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. तेव्हा मी हा चित्रपट करायचं ठरवलं.

आणीबाणी आणि नसबंदी हा विषय जबरदस्त आहे. परंतु स्क्रिप्ट अगदी हलकी-फुलकी आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजन असेल. हा चित्रपट ७० च्या दशकातील आहे. त्यावेळेची स्टाईल वेगळी होती. ती या चित्रपटात तुम्हाला दिसून येईल.

चित्रपटाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. त्याला अशा गंमतीदार पद्धतीनं सादर करणं योग्य आहे का?

सरकॅसम ही खूप मोठी गोष्ट आहे. व्यंग नेहमीच सत्य सांगते. एखाद्या कलाकाराचं काम देखील तसंच आहे. सामान्य व्यक्ती एक लेख वाचतो. परंतु चित्रकार त्याला चित्रातून तर गायक ती गोष्ट गायकितून सर्वांपर्यंत पोहोचवतो.

आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे आयुष्य थांबत नाही. तुमची नसबंदी झाली तर तुम्ही रिपोर्टिंग करणं सोडून द्याल का?  आयुष्य तसंच जगावं लागतं. तशीच अवस्था इंदरची आहे. कधीकधी तो भावूक होतो तर कधी एखाद्या मजेदार परिस्थितीत अडकतो.

लिक्विड आणि मुन्नाबद्दल हजारो मिम्स आहेत बनवले आहेत. तुम्ही चाहत्यांच्या या प्रेमाकडे कसं बघता?

मी देवाचा आभारी आहे. एवढ्या अल्पावधीत फारच कमी लोकांना दोन आयकॉनिक भूमिका करण्याची संधी मिळते. मी कधीही विचार केला नाही की माझ्या वाट्याला लिक्विडसारखी भूमिका येईल. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही पात्रं पूर्णपणे भिन्न आहेत. एक उत्तर ध्रुव आहे आणि दुसरा दक्षिण ध्रुव आहे. अभिनेता म्हणून मला हे करायचे होते.

माझ्यावर थिएटर क्षेत्रात संस्कार झाले. त्यानंतर मी अभिनयाचे धडे फिल्म स्कूलमध्ये घेतले. तेव्हापासून मला वेगवेगळ्या आशयाच्या भूमिका करायच्या होत्या. आपण एकाच प्रकारच्या चित्रपटांमध्ये तेच तेच काम करत राहिलो तर त्यात काही मजा नाही. मी असं म्हणत नाही की, जे हे करत आहेत ते चुकीचं आहे, हा त्यांचा निर्णय आहे. मला फक्त भिन्न भूमिका करायच्या आहेत आणि मी त्या करत राहिन. प्रेक्षकही हे स्वीकारत आहेत आणि प्रेम देत आहेत. हे पाहून मला आनंद झाला आहे.

मुन्नाच्या व्यक्तिरेखेसाठी तुम्ही स्वत:ला कसे तयार केले?

हे खूप कठीण होतं. कारण मी यापूर्वी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. दुसरी गोष्ट अशी की, जेव्हा आपल्याला डार्क कॅरेक्टर मिळते तेव्हा आपण त्यास व्हिलन बनवतो. मी मुन्नाला खलनायक नव्हे तर एक माणूस बनवणं खूप महत्वाचं होतं. म्हणूनच मुन्नाची फॅन फॉलोइंग इतकी जास्त आहे.

मिर्जापूर 2 बद्दल काय सांगशील?

माझ्याकडे अद्याप मिर्झापूर 2 प्रदर्शनाबद्दल काही माहिती नाही. पण शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. आतापर्यंत किती काम केलं गेलं हे मला माहिती नाही.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा