Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात विजय दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे.

अनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार
SHARE

व्हेलेंटाईन डेच्या निमित्तानं विजय देवरकोंडा याचा फेमस लव्हर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बरं, असं असूनही, अभिनेता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीला देखील लागला आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात विजय दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे.


'हे' आहे चित्रपटाचं नाव

चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटर असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत असेल. याशिवाय आणखीन अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.


ट्वीट करत दिली माहिती

पुरी जगन्नाथ यांनी ट्वीट केलं आणि लिहिलं की, विजय देवरकोंडाबरोबर पॅन इंडिया व्हेंचरमध्ये अनन्याचं स्वागत करायला आनंद होत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चर्मे कौर, अपूर्व मेहता यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करायला मजा येईल.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनीही ट्विटद्वारे एकमेकांचं स्वागत केलं आहे. फायटर चित्रपटाचं बॉलिवूडशी देखील कनेक्सऩ आहे. कारण या चित्रपटाचा करण जोहर देखील निर्माता आहे. अनन्या या चित्रपटाद्वारे तेलुगू क्षेत्रात पदार्पण करत आहे. ती पहिल्यांदाच विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.


अनन्या पांडेचे चित्रपट

अनन्या पांडेनं 'स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटात ती भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. अनन्याच्या दोन्ही चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा झाली. तर विजय देवरकोंडाच्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर कबीर सिंग या भूमिकेत दिसला होता.हेही वाचा

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे पुढील प्रसारण थांबवा, अर्जुन खोतकरांची मागणी

'83' चित्रपटातील रणबीर-दिपिकाचा फर्स्ट लुक प्रदर्शित


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ