Advertisement

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे पुढील प्रसारण थांबवा, अर्जुन खोतकरांची मागणी

सेना नेते अर्जुन खोतकर यांनी या मालिकेच्या शेवटचे भाग न दाखवण्याची मागणी केली आहे. पण त्यांना ही मागणी का केली? आणि यावर अमोल कोल्हे काय बोलले हे जाणून घ्या.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे पुढील प्रसारण थांबवा, अर्जुन खोतकरांची मागणी
SHARES

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. अर्थात संभाजी महाराज यांच्यावरील प्रेम आणि महाराष्ट्राला लाभलेला इतिहास हे या मालिकेच्या लोकप्रियतेचं एक कारण आहे. पण आता या मालिकेमुळे एका नवा समोर आला आहे.

"शेवटचा भाग दाखवू नये" 

सेना नेते अर्जुन खोतकर यांनी या मालिकेच्या शेवटचे भाग न दाखवण्याची मागणी केली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकेनं शेवटचा टप्पा गाठला आहे. संभाजी राजे शत्रुच्या हाती लागले आहेत. शत्रुच्या हाती लागल्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. संभाजी राजांचा झालेला हाच छळ पाहावणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना यामुळे दुखावल्या जातील. म्हणूनच खोतकर यांनी मालिकेचा शेवटचा भाग दाखवू नये अशी मागणी केली आहे.

"मनाला न पटणारी दृश्यं"

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेत सध्या संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचे दाखवण्यात येत असून यानंतरची दृश्यं पाहणं मनाला पटणारं नाही, या मालिकेतील असं चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आम्ही हा सर्व विचार करूनच पुढच्या भागांचं चित्रिकरण केलं आहे. मला माहित आहे की हा मुद्दा संवेदनशील आहे. त्याप्रकारेच हा मुद्दा आम्ही हाताळलाय. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांच्यावर होणारा अत्याचार लोकं कशाप्रकारे घेतात यावर मी आता काही बोलू शकत नाही.

मालिकेवरून चर्चांना उधाण

दरम्यान, ऐतिहासिक मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत असल्याची उलट सुलट चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. यावर मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे ट्वीट करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

टीआरपीत टॉप

स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश:डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेनं टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते. परंतु, आता फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार असल्याची माहिती मिळाली आहेहेही वाचा

रितेश, नागराज आणि अजय-अतुल साकारणार महाराजांची महागाथा

नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा