Advertisement

नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’

सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’
SHARES

नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका २४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सरिता आणि सूर्या असं त्यांच्या पात्राचं नाव असून कुटुंबाच्या सुखासाठी आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी केलेला त्याग हा मालिकेचा महत्त्वाचा दुवा आहे.

वाहिनीच्या प्रत्येक मालिकेतून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या वेगळ्या प्रयत्नाला प्रेक्षकांचंही भरभरुन प्रेम मिळत आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, सहकुटुंब सहपरिवार एक अशी मालिका आहे जी संपूर्ण कुटुंबासाठी बनवण्यात आली आहे. टीव्हीवर सशक्त आशय दाखवण्याच्या हेतूनं करण्यात आलेला आणखी एक प्रयत्न. मराठी परंपरा जपणारी, मराठी प्रेक्षकांना नेमकं काय बघायला आवडेल? याचं भान ठेवून सादर केली जाणारी घरगुती गोष्ट. आई कुठे काय करते मालिकेतील आई जशी घराघरात पोहोचली आहे. अगदी त्याचप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार ही मालिकाही पोहोचेल. संवेदनापूर्ण या मालिकेचा प्रत्येक भाग मनाला भिडेल ही खात्री आहे.’

सुनील बर्वे म्हणाले, स्टार प्रवाहसोबत मी याआधी बे दुणे दहा, लेक माझी लाडकी अशा अनेक मालिका केल्या आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नक्कीच वेगळ्या धाटणीची आहे. या मालिकेमध्ये सूर्या ही भूमिका साकारतो आहे. अतिशय विनम्र आणि मवाळ असं हे पात्र आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व पटवून देणारी ही मालिका आहे.'

आताच्या घडीला बरेच जण विभक्त कुटुंबाकडे वळत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व ही मालिका पटवून देऊ शकते. आता ही मालिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते हे लवकरच कळेलहेही वाचा

महेश मांजरेकरांच्या मुलीचं मराठीत पहिल पाऊल, या चित्रपटातून करणार पदार्पण

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा