गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या इरफान खानने 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा इमोशनल ट्वीट केलं आहे. याचसोबत त्याने त्याचा आगामी सिनेमा ‘कारवां’चं पोस्टर शेअर केलं आहे. या कॉमेडी सिनेमात इरफान महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
इरफानने ट्विटरवर ‘कारवां’ या सिनेमाचा पोस्टर शेअर करत एक इमोशनल ट्वीट केलं आहे.
सुरुवातीच्या निरागसतेचा अनुभव विकत घेता येऊ शकत नाही. 'कारवां'मध्ये एकत्र आल्याबदल दिलकर आणि मिथिलाचे आभार. सध्या दोन 'कारवां'चालू आहेत एक म्हणजे चित्रपट आणि दुसरा मी'
त्याचा कारवा हा सिनेमा 10 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सिनेमात इरफान व्यतिरिक्त दिलकर आणि मिथिला प्रमुख भूमिकेत आहेत. हा एक कॉमेडी सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती आकर्ष खुरानाने केली आहे.
मागच्या महिन्यात इरफानचा 'ब्लॅकमेल' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्याने उत्कृष्ठ अभिनय केलं होतं. पण त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छाप पाडू शकला नाही. पण आता त्याचा कारवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल दाखवेल, अशी अपेक्षा इरफानला आहे. पण इरफानच्या चाहत्यांना मात्र त्याच्या सिनेमापेक्षा त्याच्या तब्बेतीची जास्त काळजी आहे. इरफानने लंडन येथून उपचार घेऊन लवकर भारतात यावं, अशी इच्छा त्याच्या चाहत्यांनी बोलून दाखवली आहे.
हेही वाचा -