Advertisement

इरफान खाननेच केला आपल्या गंभीर आजाराचा खुलासा


इरफान खाननेच केला आपल्या गंभीर आजाराचा खुलासा
SHARES

आपला लाडका बिल्लू म्हणजेच अभिनेता इरफान खान आजारी असल्याचं कळल्यापासूनच त्याचे चाहते चिंतीत आहेत. इरफानच्या आजाराबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र आता इरफानने स्वत:च आपल्या आजाराचा खुलासा केला आहे.

इरफानला न्युरो इंडोक्राईन ट्यूमर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरील उपचारासाठी लवकरच इरफान परदेशात रवाना होणार आहे. चाहत्यांना सांगितल्याप्रामणे इरफानने ट्वीट करत आपल्या आजाराबाबत माहिती दिली.

 इरफान म्हणतो 'आयुष्यात अचानक अशी काही वळणे येतात, की तुम्हाला पुढे जायला भाग पाडतात. माझं आयुष्य गेल्या काही दिवसांपासून याच वळणावर येऊन ठेपलं आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्यूमर झाला आहे. हा आजार स्वीकारणे माझ्यासाठी सोपं नाही. पण माझ्या आजाराबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. न्युरो कायम मेंदूसाठी नसतो. माझ्या आजाराबद्दलची अधिकृत माहिती येईपर्यंत प्रतिक्षा केली, त्याबद्दल आभार. मी पुन्हा एकदा पुढच्या माहितीसाठी तुमच्या समोर येईन.’

इरफानने बिल्लू बाबर, पीकू, मदारी, पान सिंह तोमर, लाईफ इन मेट्रो, लाईफ ऑफ पाय, सलाम बॉम्बे असे हीट चित्रपट केलेत. भन्नाट अभिनयामुळे इरफानने आपल्या चाहत्यांच्या मनात घरं केलं. तो लवकर बरा व्हावा यासाठी केवळ त्याचे चाहतेच नाही तर सगळा प्रेक्षकवर्ग त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे.


हेही वाचा - 

इरफानच्या आजारपणाबद्दल काय म्हणतेय त्याची पत्नी...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा