Advertisement

इरफानच्या आजारपणाबद्दल काय म्हणतेय त्याची पत्नी...

नुकतेच इरफान खानची पत्नी सुतपा सिकदरने फेसबुक अकाऊंटवरून इरफानच्या आजारपणाविशयी पोस्ट लिहीली आहे, आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

इरफानच्या आजारपणाबद्दल काय म्हणतेय त्याची पत्नी...
SHARES

काही दिवसांपूर्वी इरफान खानने केलेल्या ट्वीटमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. इरफानने केलेल्या ट्वीटमुळे तो एका गंभीर आजाराने ग्रासला आहे हे चाहत्यांना समजले. मात्र त्याच्या ट्वीटनंतर त्याला नेमका कोणता आजार झाला आहे? याविषयी तर्क वितर्क सुरू झाले. इरफानला ब्रेन ट्यूमर किंवा ब्लड कॅन्सर असण्याची शक्यताही अनेकांनी वर्तवली. मात्र या सगळ्यावर इरफानने मौन पाळणेच पसंत केलं आहे. 'योग्य वेळ आल्यावर काय ते सांगेन' असं इरफानने त्याच्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं होतं.

नुकतंच त्याची पत्नी सुतापा सिकदरने फेसबुक अकाऊंटवरून इरफानच्या आजारपणाविषयी पोस्ट लिहिली आहे.


सुतापा म्हणते, 'माझा बेस्ट फ्रेंड ,माझा जोडीदार या सगळ्याशी योग्यरीतीने लढत आहे. तो याचा चांगल्या रीतीने सामना करत आहे. मी सध्या कोणाच्या मेसेजला, फोनला रिप्लाय देऊ शकत नाही, यासाठी मी दिलगीरी व्यक्त करते. इरफानसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, यासाठी आम्ही आभारी आहोत. देवाने आम्हाला या परिस्थितीशी लढायला ताकद दिली आहे. त्यासाठी मी देवाची ऋणी आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच इरफानच्या मागे असू देत. तुमच्या शुभेच्छांमुळेच तो यातून लवकर बाहेर येईल. इरफानच्या आजाराबद्दल तर्कवितर्क लावू नका. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार'.

इरफानने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने पुढच्या १० दिवसांत स्वता:बद्दल माहिती देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता इरफानच्या पुढच्या ट्वीटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सध्या इरफान लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.



हेही वाचा

इरफान म्हणतो, 'मला गंभीर आजाराने ग्रासलं'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा