Advertisement

इरफान म्हणतो, 'मला गंभीर आजाराने ग्रासलं'


इरफान म्हणतो, 'मला गंभीर आजाराने ग्रासलं'
SHARES

प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता इरफान खान याला सध्या एका गंभीर आजाराने ग्रासलं आहे. होय ही माहिती खुद्द इरफाननेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.


ट्वीटमध्ये काय म्हणाला इरफान?

 इरफानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'एखाद्या सकाळी तुम्ही उठता आणि तुम्हाला असं काही कळतं ज्याने तुमचं आयुष्यच बदलून जातं. माझ्या आयुष्यातील गेले १५ दिवस एका गूढ कथेप्रमाणे गेले आहेत. पण ही गुढ कथा मला एका दुर्मिळ आजारापर्यंत नेणार आहे, हे मला माहीत नव्हतं. मी सध्या एका गंभीर आजाराशी लढत आहे. मी आयुष्यात कधीच तडजोड केलेली नाही. मला हव्या त्या गोष्टींसाठी मी भांडत आलो आहे. आणि भविष्यातही हेच सुरू राहील. माझे कुटुंब आणि माझे मित्र माझ्यासोबत आहेत. आम्ही यातून मार्ग काढत आहोत. 8 ते 10 दिवसात रिपोर्ट्स आल्यावर मी तुम्हाला सर्व सांगेन. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा.

इरफानच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना जबरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानला कावीळ झाल्याचं समोर आलं होतं. इरफानचा हा पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे इरफान या आजारातून सहीसलामत बाहेर पडेल, यात शंका नाही.


इरफानचा पुढील चित्रपट कोणता?

इरफानने सलाम बॉम्बे, फुटपाथ, बिल्लू, पीकू, मदारी, पान सिंह तोमर, लाईफ इन मेट्रो, लाईफ ऑफ पाय, हिंदी मीडियम या चित्रपटात दर्जेदार अभिनय केलं आहे.

लवकरच इरफान प्राईम व्हिडिओ सीरिजच्या 'द मिनस्ट्री' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर तो विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदूकोणचीही महत्त्वाची भूमिका आहे. २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा