नागरिकत्वावर अखेर अक्षयनं तोडली चुप्पी

अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरून सोशल मीडियावर बराच वाद झाला. यावरून अक्षय प्रचंड ट्रोल झाला. पण अखेर या विषयावर अक्षयनं आपली चुप्पी तोडली आहे. भारतात मतदान न करण्यावरून त्यानं पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे.

अक्षय म्हणाला की, 'माझ्या नागरिकत्वाबाबत नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत? माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या ७ वर्षांत कधीही लपवलं नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या ७ वर्षांत कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढंच खरं आहे.

मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जात आहे, हे पाहून दुःख होतंय.


हेही वाचा-

टायगर-आलियाचं 'हुकअप साँग'

श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण


पुढील बातमी
इतर बातम्या