श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

करण जोहरनं अनेक नवनवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. खुशी कपूरला देखील करणनेच संधी दिली आहे. 'बादशाह' या चित्रपटातून खुशी बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

SHARE

अभिनेत्री जान्हवी कपूरनंतर श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी कपूर देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरनं पहिल्यांदाच 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता तिच्या पाठोपाठ श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर ही अभिनय क्षेत्रात उतरली आहे.


बादशाहमध्ये झळकणार

करण जोहरनं अनेक नवनवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. खुशी कपूरला देखील करणनेच संधी दिली आहे. 'बादशाह' या चित्रपटातून खुशी बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. मध्यंतरी खुशी आणि शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान एकत्र झळकणार असल्याचे वृत्त होते.


कोणासोबत डेब्यू आवडेल?

यानंतर नेहाच्या 'बीएफएफ्स विथ वोग सीझन ३' या शोमध्ये खुशी आपली बहिण जान्हवी कपूरसह उपस्थित होती. तेव्हा खुशीनं एक महत्त्वाचा खुलासा केला होता. बॉलिवूडमध्ये कोणासोबत डेब्यू करायला आवडेल? असा प्रश्न नेहाने खुशीला विचारला होता. त्यावेळी खुशीनं शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, चंकी पांडेचा भाचा अहान पांडे आणि जावेद जाफरीचा मुलगा मजान जाफरी या तिघांची नावं घेतली. तर या तिघांमध्ये सर्वात अधिक अहान पांडेच्या नावाला जास्त प्राधान्य दिले होते. तसंच आपल्या वडिलांना हे मान्य नसल्यास मी त्यांना पटवून देईन.' असंही खुशीनं त्यावेळी सांगितले होतं.
संबंधित विषय
ताज्या बातम्या