coronavirus : 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

इरफान खान, करीना कपूर खान आणि राधिका मदन यांच्या मुख्य भूमिका असलेला अंग्रेजी मीडियम हा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी मीडियमचा हा पुढचा भाग आहे. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट १३ मार्च २०२० मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण दुसऱ्याच दिवसापासून कोरोनाव्हायरसमुळे अंशत: लॉकडाऊन करत थिएटर बंद करण्यात आले होते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.  

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी थिएटर बंद केल्यानं प्रेक्षक हा चित्रपट पाहूच शकले नाहीत. पण आता हा चित्रपट प्रेक्षकांनी घर बसल्या पाहता येणार आहे. डिस्नी प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. इरफान खाननं चित्रपटाचा प्रीमियर डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर दाखवणार असल्याची घोषणा केली.

अंग्रेजी मीडियमच्या निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली होती. एकदा सर्वकाही व्यवस्थित झाल्यावर थिएटर पुन्हा उघडली जातील. तेव्हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार होता, अशी माहिती बॉलिवूड हंगामानं दिली आहे. यात असंही म्हटलं आहे की निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार केला होता.त्यानुसार चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

अंग्रेजी मीडियम या चित्रपटाची कथा चंपक बन्सल (इरफान खान) आणि तारिका बंसल (राधिका मदन) या वडिल मुलीच्या आयुष्याभोवती फिरत आहे. मिठाई विक्रेता चंपक आपल्या मुलीच्या इच्छेसाठी सर्वकाही करतो. लंडनमध्ये पुढील अभ्यास करण्याचं तारिकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जीव की प्राण लावतो. तिचं स्वप्न कसं पूर्ण करतो हे यातून मांडण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिक घरात देखील कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल यात काही शंका नाही.


हेही वाचा

'साराभाई Vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

Coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह

पुढील बातमी
इतर बातम्या