Advertisement

coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह

कनिका कपूरवर लखनऊच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी तिच्या ५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

coronavirus : अखेर कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटिव्ह
SHARES

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोना झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सातत्यानं तिच्या टेस्ट करण्यात येत होत्या. आता तिची सहावी कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती नेगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

कनिका कपूरवर लखनऊच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी तिच्या ५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पण तिच्या पाचही वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे तिच्या कुटुंबिय चिंतेत होते. पण तिच्या सहाव्या चाचणीचा वैद्यकीय अहवाल शनिवारी रात्री आला. त्यात तिच्यासाठी दिलासादायकच बातमी होती ती म्हणजे तिची सहावी चाचणी नेगेटिव्ह आली होती.

कोरोनाची सहावी चाचणी नेगेटिव्ह येण्यापूर्वी कनिकानं ट्विट केलं होतं की, पहिल्यापेक्षा आता तब्येत चांगली आहे. मला आशा आहे की पुढची टेस्ट निगेटिव्ह येईल. त्यानंतर आता कनिकाची सहावी टेस्ट झाली असून त्यात रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र तरीही तिला पुढचे काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बेबी डॉल फेम गायिका कनिकाच्या तब्येतीबाबतची माहिती संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉक्टर आर के धीमान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, कनिका कपूरमध्ये आता कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तिची तब्येत आता स्थिर असून चांगली आहे. सर्वसामान्यपणे अन्न खाऊ शकते.

कनिका ९ मार्चला लंडनहून मुंबईत आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी लखनऊ इथं काही पार्ट्यांना तिनं हजेरी लावली होती. तिच्या बेजबाबदारपणाबद्दल उत्तर प्रदेशात तिच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. भारतात जन्म झालेली कनिका आता इंग्लंडची नागरिक आहे.




हेही वाचा

शाहरुखची सरकारला आर्थिक मदत, चाहते म्हणाले तुच खरा 'हिरो'

रामायण ठरलं सुपरहिट, TRP मध्ये रचला इतिहास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा