Advertisement

शाहरुखची सरकारला आर्थिक मदत, चाहते म्हणाले तुच खरा 'हिरो'

सलमान खाननं २५ हजार दैनंदिन मजुरांची जबाबदारी उचलली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

शाहरुखची सरकारला आर्थिक मदत, चाहते म्हणाले तुच खरा 'हिरो'
SHARES

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरबसल्या आहोत. थिएटर बंद आहेत आणि बॉलिवूडचा व्यवसाय ठप्प झाला आहे. कोरोनामुळे सध्या भारताला कोरोना विषाणूसारख्या साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सर्वजण एकत्रित लढा देत आहेत. एकीकडे, अनेक स्टार आपापल्या घरात आहेत आणि या कठीण काळात ते एक मोठी देणगी देत आहेत. अक्षय कुमारनं कोरोना काळात देशासाठी २५ कोटींची देणगी दिली आहे. तर सलमान खाननं २५ हजार दैनंदिन मजुरांची जबाबदारी उचलली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, मनोरंजन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि रेड चिलीज व्हीएफएक्स आणि एनजीओ मीर फाउंडेशन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शाहरुखनं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठी देणगी दिली आहे.यासोबतच त्यानं इतरही अनेक संस्थांना देणगी दिली आहे.


काय म्हणाला शाहरुख?

शाहरुख खाननं सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं आहे की, "जे लोक याक्षणी तुमच्यासाठी अथक परिश्रम करत आहेत त्यांना कदाचित तुम्ही ओळखत नसाल. तरी तुम्ही त्यांना एकटे वाटू देऊ नका. संपूर्ण देश आणि सर्व भारतीय एकाच कुटुंबासारखे आहेत." शाहरुख खान यांनी या पोस्टसह एक पत्र पोस्ट केलं आहे. ही संस्था कोणत्या प्रकारे लोकांना मदत करेल याबद्दल माहिती देण्यात आली आहे.


कशाप्रकारची मदत करतोय?

त्यानं पंतप्रधान आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत जमा केली आहे. याव्यतिरिक्त, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किटच्या माध्यमातून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबियांना महिन्याभरात अन्न आणि आवश्यक वस्तू तसंच जनतेला अन्न देण्याची घोषणा केली आहे. तसंच कोरोना विषाणूविरूद्ध जनजागृती करण्यातही मदत करणार असल्याचं शाहरुखनं सांगितलं.

पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी ट्विट करत शाहरुखचे आभार मानले.

शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचं दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्वीट केलं आहे की, "योग्य पाऊल उचललं. सर्व संघटनांनी या क्षणी एकत्र येणं महत्वाचं आहे. खूप चांगले आणि अचूक पाऊल. नेहमीप्रमाणे."


सोशल मीडियावर प्रतिक्रिया

त्याच्या एका चाहत्यानं लिहिलं की देशाची शान शाहरुख खान आहे. दुसर्‍या एकानं लिहलं आहे की, "तुम्ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी विशेष करून सेलिब्रिटींसाठी. एकानं लिहलं की तुम्ही दिलदार आहात.



हेही वाचा

Coronavirus : 'या' बॉलिवूड कलाकारांची सरकारला साथ, पुढे केला मदतीचा हात

काबा, मदिना बंद, तर भारतातील मशिदी का नाही?- जावेद अख्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा