Advertisement

काबा, मदिना बंद, तर भारतातील मशिदी का नाही?- जावेद अख्तर

जर काबा आणि मदिना या जगभरातील मुस्लिमांची धार्मिक स्थळं बंद होऊ शकतात, तर भारतातील मशिदी का नाही? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून विचारला आहे.

काबा, मदिना बंद, तर भारतातील मशिदी का नाही?- जावेद अख्तर
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग होऊ नये म्हणून देशभर लाॅकडाऊन करण्यात आला आहे. सर्व धर्मांची प्रसिद्ध धार्मिक स्थळंही बंद करण्यात आलेली आहेत. अशा स्थितीतही देशात काही मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आल्यावर बाॅलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (bollywood lyricist javed akhtar) यांनी त्यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर काबा आणि मदिना या जगभरातील मुस्लिमांची धार्मिक स्थळं बंद होऊ शकतात, तर भारतातील मशिदी का नाही? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून विचारला आहे. 

धार्मिक स्थळांना आवाहन

देशात लाॅकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वच्या सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद करण्यात आल्या. सोबतच नेहमीच गर्दीने गजबजलेली धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं बंद करण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं. गर्दी टाळणे हा यामागचं महत्त्वाचा उद्देश होता. परंतु देशातील काही ठिकाणच्या मशिदीत अजूनही नमाज पठण होत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांतून पुढं आलं होतं. 

मर्कझवर टीका

दरम्यान, दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला एकूण ८ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. यात भारताच्या विविध भागातून त्याचबरोबर इतर देशातूनही लोक आले होते. यामध्ये २५ जणांना करोनाची लागण झाल्याच समोर आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. 

हेही वाचा- नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा

काय म्हणाले अख्तर?

जावेद अख्तर स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांचा हवाला देत एक ट्विट केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “जो पर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील मशिदी का बंद होऊ शकत नाही,”  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा