चित्रपट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. याच ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा चित्रपट सहभागी होता. ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत न्यूटनला नामांकन मिळाले होते. पण आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
ऑस्करच्या ट्वीटर हँडलवर 9 चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत न्यूटनचा उल्लेख नाही. या यादीत 'अ फँटॅस्टिक वुमन', 'इन द फेड ऑन बॉडी अँड सोल', 'फॉक्सट्राट', 'दि इनसल्ट', 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' या चित्रपटांना स्थान मिळाले आहे. फॉरेन लँग्वेज चित्रपटांच्या यादीत नऊ चित्रपटांचा उल्लेख आहे. यापैकी तुम्ही किती पाहिलेत? द अकॅडेमीच्या ट्वीटर हँडलवर हे कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीनं 26 चित्रपटांमधून 'न्यूटन' ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर मराठमोळ्या अमित मसुरकरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. छत्तीसगडमधल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. राजकुमारनं यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारशिवाय पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा