श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव बॉलिवूडमधली नवी जोडी

  Mumbai
  श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव बॉलिवूडमधली नवी जोडी
  मुंबई  -  

  वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा अभिनेता राजकुमार राव लवकरच श्रद्धा कपूरसोबत नव्या चित्रपटात झळकणार आहे. राजकुमार रावनं ट्वीटरवरून चाहत्यांना माहिती दिली. 'श्रद्धा कपूरसोबत हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे,' असं त्यानं ट्वीटरवर सांगितलं. सध्या या चित्रपटाचं नाव ठरलं नसून त्यावर काम सुरू आहे.


  श्रद्धा कपूरनं देखील ट्वीट करत यासंर्भात माहिती दिली. 'माझ्या आवडत्या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांच्यासोबत मी पहिल्यांदाच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटात काम करणार आहे,' असं ट्वीट श्रद्धानं देखील केलं आहे.

   

  राजकुमार रावनं 'न्यूटन' चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. फक्त 'न्यूटन'च नाही, तर 'ट्रॅप्ड', 'सिटीलाईट', 'शाहीद'सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याला तो प्राधान्य देतो. राजकुमार आणि श्रद्धा ही जोडी पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते की नाही? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकेल.  हेही वाचा

  विराट आणि अनुष्का यांचं लवकरच शुभमंगल?


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.