Advertisement

राजकुमार रावचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत!


राजकुमार रावचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत!
SHARES

अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'न्यूटन' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. यासोबतच 'न्यूटन' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत देखील दाखल झाला आहे. ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून 'न्यूटन' या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमा गटातील पुरस्कारांच्या स्पर्धेत 'न्यूटन' सिनेमा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने ही घोषणा केली आहे



ऑस्करच्या शर्यतीत भारताकडून २६ सिनेमे होते. त्यातून 'न्यूटन' या चित्रपटाची निवड करण्यात आली. या सिनेमात अभिनेता राजकुमार राव याची प्रमुख भूमिका आहे. यासोबतच पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुवीर यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. न्यूटनची ऑस्करसाठी निवड झाल्याने अभिनेता राजकुमार राव याने ट्वीटरवर आनंद व्यक्त केला आहे.



चित्रपटात राजकुमारने 'न्यूटन' नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. छत्तीसगडच्या एका लहानशा गावात स्वतंत्र निवडणूक घेण्याची जबाबदारी न्यूटन म्हणजे राजकुमारची असते. त्याची जबाबदारी तो कशाप्रकारे पार पाडतो? किंवा त्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? त्यासोबतच 'न्यूटन'चे नाव न्यूटन पडण्यामागे काय कारण आहे? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा