अभिनेता सुशांत सिंग राजपूतवर मुंबईत होणार अंत्यसंस्कार

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहंत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांना त्याच्या घरात कोणतिही सुसाइड नोट मिळालेली नाही. दरम्यान सुशांतवर आज विलेपार्ले येथील स्मशान भूमीतच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. सुशांतचे कुटुंबिय ही अंत्य संस्कारासाठी मुंबईत थोड्याच वेळात दाखल होणार आहे. 

हेही वाचा-सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेचे वृत्त पसरताच संपूर्ण बाँलीवूड हारले. अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांसह राजकिय मंडळींनी सुशांतने उचललेल्या  टोकाच्या पाऊलाबद्दल आश्चर्य व्यक्त  करत त्याला श्रद्दांजली वाहिली. आत्महत्येनंतर सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेहण्यात आला. मध्यरात्री शवविच्छेनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात सुशांतचा मृत्यू हा गळफास घेऊनच झाल्याचे म्हटलं आहे. त्याच्या रक्ताचे नमूने हे वैद्यकिय प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याचे सांगितले जाते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले. त्यावर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आक्षेप घेत, हे फोटो वायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कुणी तर जाणून बुजून हे फोटो वायरल करत आहेत. याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एका ट्विट द्वारे सोशल मिडियावर अशा प्रकारच्या घटनांमध्ये चुकीच्या पोस्टबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. 

हेही वाचा-गुड न्युज: मुंबई लोकल ट्रेन अखेर सुरू, पण..

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात  त्याचे चाहते जमू लागले असून त्याच्या अंत्य संस्कारावेळी ही मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळेच पोलिसांनी सुशांतच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.  तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी एकत्र न जमण्याचे आवाहन केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलिस शोध घेत आहेत. 


पुढील बातमी
इतर बातम्या