१९ वर्षांच्या करीनाचा ‘अंग्रेजी’ अवतार पाहिला का?

करीना कपूरच्या फिल्म इंडस्ट्रीतील कारकिर्दीला १९ वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधत ‘अंग्रेजी मीडियम’ या आगामी हिंदी चित्रपटातील तिचा लुक रिव्हील करण्यात आला आहे.

ग्लॅमरस भूमिका

करीनानं आजवर नेहमीच नाना तऱ्हेच्या भूमिका साकारल्या आहेत. ग्लॅमरस भूमिकांच्या जोडीला तिनं रफटफ व्यक्तीरेखाही वठवल्या आहेत. याखेरीज आयटम साँगमधील मादक अदांनी तिनं प्रेक्षकांना घायाळही केलं आहे, पण ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल असलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये करीना काहीशा हटके लुकमध्ये दिसणार आहे. निर्माता दिनेश विजान यांच्या मॅडाक फिल्म्सच्या बॅनरखाली सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. करीनाच्या पदार्पणाचा ‘रिफ्युजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन १९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विजान यांनी ‘अंग्रेजी मीडियम’मधील तिचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भूमिकेसाठी स्लीम

या चित्रपटात करीना पोलिसी भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ती खूप स्लीम झाल्याचं फोटोत दिसत आहे. कमीत कमी मेकअपच्या सहाय्यानं करीना ही व्यक्तिरेखा पडद्यावर सादर करत आहे. या फोटोमध्ये करीनानं एक साधा शर्ट परीधान केला असून, करमेला पोलिसांचा बॅच आहे. यातील पोलिसी युनिफार्ममधील करीनाचा लुक अद्याप रिव्हील करण्यात आलेला नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन अदजानीया करत असून, सध्या लंडनमध्ये या चित्रपटाचं शूट सुरू आहे.

वेगळंच कनेक्शन

‘अंग्रेजी मीडियम’मध्ये करीनाच्या जोडीला इरफान खान आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय पूर्वी जैन, दीपक डोब्रियाल, मनु रिषी, मीरा दांडेकर, पंकज त्रिपाठी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘हिंदी मीडियम’मध्ये इरफानची जोडी पाकिस्तानी अभिनेत्री साबा कमरसोबत जमली होती, पण या चित्रपटात मात्र इरफानची नायिका राधिका आहे. त्यामुळं इरफान-करीनाचं एक वेगळंच कनेक्शन यात पहायला मिळेल असं बोललं जात आहे.


हेही वाचा -

मुंबईत अतिवृष्टी! फक्त ३ दिवसांत पडला जून महिन्याएवढा पाऊस

सलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली


पुढील बातमी
इतर बातम्या