Advertisement

सलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

मुंबईसह उपनगरात शुक्रवारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, सलग चौथ्या दिवशीही पावसानं जोरदान हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईतील हिंदमाता, दादर, परळ, लालबाग, माटुंगा, भांडूप, विक्रोळी, कुर्ला, सायन यांसह अनेक भागांत पाणी साचलं आहे.

सलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली
SHARES
Advertisement

मुंबईसह उपनगरात शुक्रवारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, सलग चौथ्या दिवशीही पावसानं जोरदान हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईतील हिंदमाता, दादर, परळ, लालबाग, माटुंगा, भांडूप, विक्रोळी, कुर्ला, सायन यांसह अनेक भागांत पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना वाट काढत जावं लागतं आहे. त्याशिवाय, रेल्वे वाहतूकीवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे. पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वे उशिरानं धावत आहे.

रेल्वेवर परिणाम

मुंबईतील जोरदार पावसामुळं रेल्वेवरही परिणाम झाला आहे. पावसाचं पाणी रेल्वे रुळांवर साचल्यानं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच, पश्चिम आणि हार्बर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिट उशिरान सुरू आहे

चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद

मरीन लाइन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर  चर्नी रोड भागात एक ट्रेन बंद पडल्याने जलद लोकल्सची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

२४ तासातील पाऊस

मुंबई सांताक्रुज वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ९२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा वेधशाळेनुसार गेल्या २४ तासात ७८.५ मिमी पावसाची नोंद आहे. सायन-माटुंगा रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर वडाळा येथील फ्री वेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे.रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

मालगाडी घसरली

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक मार्गावर जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास मालगाडी घसरली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेमुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर मुंबईकडे येणारी वाहतूक सुरु आहे. मालगाडी घसरल्याने सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्सप्रेस, भुसावळ – पुणे एक्सप्रेस, पुणे – भुसावळ एक्सप्रेस, पुणे -पनवेल पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हेही वाचा -

मराठा आरक्षण कुणाच्याही ताटातून काढून दिलेलं नाही- उद्धव ठाकरेसंबंधित विषय
Advertisement