अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण

अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिती मागील आठवड्यात चंडीगडमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होती. 

नुकतंच बॉलिवूड अभिनेता वरून धवन, मनिष पॉल आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटाचे चित्रीकरण चंढीगडमध्ये सुरू असून तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  अमिताभ बच्चन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, नात आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली.याशिवाय

मलायका अरोरा, अर्जुन कपूर, जेनेलिया देशमुख, मनीष पॉल, तमन्ना भाटिया, मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनाही कोरोना झाला होता. यामधील ते पूर्णपणे बरे झाले आहेत.



पुढील बातमी
इतर बातम्या