Advertisement

सायन रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी, १ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

भारत बायोटेक कंपनीनं विकसित केलेल्या 'कोवॅक्सिन' लसी राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाली होती. त्यानंतर 'कोवॅक्सिन' लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे.

सायन रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी, १ हजार स्वयंसेवकांचा सहभाग
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, कोरोनाला आळा घालण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय असून, मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी केली जात आहे. त्यानंतर मागील ५ डिसेंबरपासून सायन रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

भारत बायोटेक कंपनीनं विकसित केलेल्या 'कोवॅक्सिन' लसी राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाली होती. त्यानंतर 'कोवॅक्सिन' लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून जगभरातील देशांमधून लसीचा शोध लावला जात आहे. अमेरिकामधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं 'कोव्हीशिल्ड' लसीचा शोध लावला आहे. सध्या त्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या लसीच्या चाचणीदरम्यान त्याचा मानवावर काही दुष्परिणाम होतात का? याचा सध्या अभ्यास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी केली जात आहे. 

एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात १ हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. दरम्यान शनिवारी ५ डिसेंबरपासून आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस देण्यात आल्याचं समजतं.

'अशी' दिली जाते लस 

  • भारत बायोटीकची कोवॅक्सिन लस दिली जाते. 
  • लस दिलेल्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितलं जातं. 
  • त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. 
  • काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येतं. 
  • स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येतं.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा