सोनम कपूरला झालाय गंभीर आजार!

अभिनेत्री सोनम कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोनमला सध्या गंभीर आजारानं ग्रासलं आहे. खुद्द सोनम कपूरनं याची कबुली दिली आहे. सोनम कपूरनं तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वसनाचा त्रास होत आहे. या आजारात श्वास घ्यायला त्रास होतो. या आजाराला ब्राँकायटिस असे म्हणतात.

'गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला याआधी कधीच श्वसनाचा त्रास झाला नव्हता. मेडिकल टर्ममध्ये या आजाराला ब्राँकायटिस म्हणतात. हा एक गंभीर आजार आहे,' असं ट्वीट तिनं केलं आहे.

अभिनेत्री रिचा चड्डानं सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी ट्वीट करत श्वसनाचा आजार झाल्याचं ट्वीट केलं होतं. 'मुंबईचं हवामान दूषित झाल्यासारखं कुणाला वाटत आहे का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला वाटतंय की मी पावडर खात आहे, असे ट्वीट तिनं केलं होतं. याला देखील सोनमनं रिट्वीट केलं आहे.

ब्राँकायटिस आजार म्हणजे काय?

ब्राँकायटिस हा आजार बरा होण्यास दोन आठवडे किंवा दोन वर्षही लागू शकतात. एकदा हा आजार झाला की दरवर्षी दोन ते तीन महिने श्वसनाचा त्रास होतो. खास करून पर्यावरणात काही बदल झाले, की हा आजार उद्भवतो.

सोनम कपूर लवकरच 'वीरे दी वेडिंग' या सिनेमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे दोन पोस्टर्स देखील प्रदर्शित झाले. आता या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू आहे. पण सध्या सोनमची प्रकृती ठीक नाही. याचा तिच्या शूटिंगवर देखील परिणाम झाला असावा.


हेही वाचा

याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन

शाहिद - मीरा पहिल्यांदाच कव्हर फोटोत एकत्र!

पुढील बातमी
इतर बातम्या