याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन

तुम्ही एखाद्या कलाकाराचे जबरदस्त फॅन असाल, तर त्यांचे चित्रपट अनेकदा बघत असाल किंवा जास्तीत जास्त त्यांचा टॅटू शरीरावर बनवून घेत असाल. पण तुम्ही कधी हेअर टॅटू बनवला आहे का? हेअर टॅटू हा काय प्रकार आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण शाहरूख खानच्या एका 'जबरा' फॅननं चक्क आपल्या डोक्यावर हेअर टॅटू बनवला आहे.

  • याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन
  • याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन
  • याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन
  • याला म्हणतात, शाहरूखचा 'जबरा' फॅन
SHARE

एखाद्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे तुम्ही जबरदस्त फॅन आहात? आहात काय नक्कीच असाल! जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फेवरेट अभिनेता किंवा अभिनेत्रीचा फोटो जपून ठेवत असाल. त्यांचे चित्रपट अनेकदा बघत असाल किंवा जास्तीत जास्त त्यांचा टॅटू शरीरावर बनवून घेत असाल. पण तुम्ही कधी हेअर टॅटू बनवला आहे का? हेअर टॅटू हा काय प्रकार आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण शाहरूख खानच्या एका 'जबरा' फॅननं चक्क आपल्या डोक्यावर हेअर टॅटू बनवला आहे.

आजा किंग खानचा 52वा वाढदिवस. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त जतीन पांचाळ या फॅननं जबरा हेअरकट करून घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं असं काय आहे? शाहरूख खानसारखा हेअरकट केला असेल? तो तर कोणीही सलूनमध्ये जाऊन करू शकतं. पण हा काही साधासुधा हेअरकट नाही. तर हा हेअरकट थ्रीडीमध्ये आहे. हो चक्क थ्रीडीमध्ये.पाहिला हा व्हिडिओ? मग कसा वाटला शाहरूखचा टॅटू असलेला थ्रीडी हेअरकट? नक्कीच आवडला असणार. जतीन शाहरूखचा एवढा मोठा चाहता आहे की, तो शाहरूखच्या वाढदिवसाला काही तरी वेगळं करत असतो. गेल्या तीन वर्षांपासून तो शाहरूखचा थ्रीडी हेअरकट करून घेतो.
शाहरूख माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगूच शकत नाही. शाहरुखचा चित्रपट आला की मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहतो. शाहरुखच्या अनेक चित्रपटांचे मी टीशर्ट करून घेतले आहे. टीशर्ट, लायटर अशा अनेक वस्तू माझ्याकडे आहेत, ज्यावर शाहरूखचे चित्र आहे. 1992 पासून मी शाहरूखला फॉलो करत आहे.

जतीन पांचाळ, शाहरूखचा फॅनथ्रीडी हेअरकट करणारा किमयागार

हेअर स्टाइलिस्ट सागर मोरे या अवलियानं शाहरुख खानची थ्रीडी हेअरस्टाईल साकारली आहे. या वेळी 'रईस' चित्रपटातील शाहरूखचा लूक त्यानं हेअरस्टाईलच्या माध्यमातून साकारला आहे. या ठेवणीत मागील बाजूनं केस बारीक करून त्यावर आवडत्या व्यक्तीचं नाव किंवा चेहरा कोरला जातो.
तसं मी अनेक सेलिब्रिटींची थ्रीडी हेअरस्टाईल साकारली आहे. पण जतीन पहिला असेल, जो शाहरूख खानची थ्रीडी हेअर स्टाइल करण्यासाठी माझ्याकडे येतो. ही हेअर स्टाईल करायला जवळपास ४५ मिनिटं लागतात.

सागर मोरे, हेअर स्टाइलिस्ट


तुम्ही शाहरूखचे फॅन आहात आणि काही तरी वेगळं ट्राय करायचं आहे? एकदम भन्नाट, तुफानी असं? मग शाहरुखच्या कोणत्याही चित्रपटातील एक लूक निवडा आणि सागर मोरे या तरूणाला नक्की भेटा.हेही वाचा

शाहरूखच्या वाढदिवसासाठी गौरी आणि सुहाना खान अलिबागमध्ये

'मिस्टर इंडिया'च्या सिक्वलमध्ये झळकणार 'या' माय-लेकीची जोडी?


संबंधित विषय
ताज्या बातम्या