Advertisement

'मिस्टर इंडिया'च्या सिक्वलमध्ये झळकणार 'या' माय-लेकीची जोडी?


'मिस्टर इंडिया'च्या सिक्वलमध्ये झळकणार 'या' माय-लेकीची जोडी?
SHARES

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चर्चा आहे की, जान्हवी कपूर तिच्याच आईच्या एका चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार आहे. आणि पहिल्याच चित्रपटात तिला तिच्या आईची साथ देखील लाभणार आहे. जान्हवी म्हणे श्रीदेवीसोबत 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. लवकरच 'मिस्टर इंडिया' चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. यामध्ये जान्हवी तिच्या आईसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.



My angel ????

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on




⛄️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on


1987 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. गेल्या अनेक दिवसांपासून मिस्टर इंडियाच्या सिक्वलची चर्चा सुरू होती. निर्माते बोनी कपूर आणि श्रीदेवी या दोघांनी चित्रपटाचा सिक्वल बनवायची इच्छा असल्याचं बोलूनही दाखवलं होतं. 





❤️❤️❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on


मध्यंतरी जान्हवी कपूर करण जोहरच्या 'सैराट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही बातमी कानावर आली होती. पण यासंदर्भातही कुठलीच घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असंही बोललं जातंय की, यासंदर्भात करण जोहरकडून अजून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता बोनी कपूर आणि श्रीदेवी या दोघांनीच आपल्या मुलीच्या करिअरची जबाबदारी उचलली आहे, असंच म्हणावं लागेल.



हेही वाचा

मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी चित्रपटातील कंगणाचे 'हे' फोटो व्हायरल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा