Advertisement

मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी चित्रपटातील कंगणाचे 'हे' फोटो व्हायरल!


मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी चित्रपटातील कंगणाचे 'हे' फोटो व्हायरल!
SHARES

सध्या कंगना रणौत 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. जयपूरमध्ये या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशात पाहायला मिळत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता, कंगनाच्या हातात तलवार देखील आहे.


झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत कंगनाला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. सध्या जयपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग हैदराबाद इथल्या रामोजी फिल्म सिटीमध्येही होणार आहे.


चित्रपटामध्ये कंगनासोबतच अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे हे प्रसिद्ध कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना झाशीच्या राणीचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. २७ एप्रिल २൦१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

आजही तिच्या सौंदर्यानं लाखो होतात घायाळ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा