Advertisement

आजही तिच्या सौंदर्यानं लाखो होतात घायाळ!

सुंदर निळ्या डोळ्यांची आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलेचा अर्थात मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आज ४४वा वाढदिवस आहे. आजही लाखो चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ होतात. जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून ते बॉलिवुड, हॉलिवुडमध्ये मजल मारण्यापर्यंतचा ऐश्वर्याचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे.

आजही तिच्या सौंदर्यानं लाखो होतात घायाळ!
SHARES

बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमधील दिग्गजांवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणारी अभिनेत्री अशी एश्वर्या राय-बच्चनची ओळख! सुंदर निळ्या डोळ्यांची आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलेचा अर्थात मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आज ४४वा वाढदिवस आहे. आजही लाखो चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ होतात. जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून ते बॉलिवुड, हॉलिवुडमध्ये मजल मारण्यापर्यंतचा ऐश्वर्याचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. आज जरी ऐश्वर्या राय बच्चन घराण्याची सून असली, तरी बॉलिवूडमध्ये तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


सौजन्य


शाळेत असतानाच मिळाली मॉडेलिंगची संधी

१ नोव्हेंहर १९७३ मध्ये कर्नाटकातल्या मंगळूर इथल्या दाक्षिणात्य कुटुंबात ऐश्वर्या रायचा जन्म झाला. ऐश्वर्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका तर बाबा कृष्णकांत समुद्र जीवनशास्त्रज्ञ होते. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे.
ऐश्वर्या नवव्या इयत्तेत असताना तिला मॉडेलिंगची संधी मिळाली होती. कॅमलिन कंपनीसाठी ऐश्वर्यानं पहिल्यांदा मॉडेलिंग केलं होतं. त्यानंतर कोक, फूजी या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये तिनं काम केलं.



लहानपणी बनायचे होते आर्किटेक्ट

आर्किटेक्ट बनायचे ऐश्वर्याचे स्वप्न होते. त्यानुसार तिनं आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. विले पार्लेच्या रूपारेल कॉलेजमध्ये ती आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होती. पण नंतर तिनं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं.



१९९४ मध्ये जिंकला मिस वर्ल्डचा किताब

१९९१ मध्ये ऐश्वर्या सुपरमॉडेल कॉन्स्टेस्ट जिंकली होती. यानंतर ऐश्वर्याला व्होग या आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळालं होतं. त्यानंतर १९९४ मध्ये तिनं मिस वर्ल्डचा किताब पटकावला. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिनं जगतसुंदरीचा किताब पटकावला. यानंतर ऐश्वर्यानं बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं.



मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रुपेरी पडद्यावरील कारकीर्दीला सुरुवात झाली. बॉबी देओलसोबत 'और प्यार हो गया' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'जिन्स'मध्ये तिनं काम केलं. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर 'ताल', 'देवदास', 'जोधा अकबर', 'गुरू' यासारख्या अनेक चित्रपटांतून तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं.




सलमानसोबत का तुटलं नातं?

सलमान खानसोबतचं ऐश्वर्याचं अफेअर चांगलंच गाजलं. 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या जवळ आले. पण सलमानच्या स्वभावामुळे त्यांच्यात मतभेद येऊ लागले. अखेर २൦൦२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर विवेक ओबेरॉयसोबत तिचं नाव जोडलं गेलं.



नंतर 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटादरम्यान ती अभिषेक बच्चनच्या जवळ आली. त्यानंतर 'उमराव जान' चित्रपटातदेखील त्यांनी एकत्र काम केलं. 'गुरू' चित्रपटादरम्यान त्यांच्यातील प्रेम आणखीन बहरलं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच अभिषेकनं ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली. २൦൦७ मध्ये ऐश्वर्यानं अभिषेकसोबत लग्न केलं. आता अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या ही गोंडस मुलगी आहे.



हेही वाचा

अर्जुन कपूरच्या 'संदीप और पिंकी फरार'चा फर्स्ट लूक!

अबब...या मालिकेचं बजेट ५०० कोटी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा