Advertisement

कोस्टल रोड बोगद्यात अडकलात तर काय कराल?

BMC ने जारी केल्या 12 महत्त्वाच्या सुरक्षा सूचना

कोस्टल रोड बोगद्यात अडकलात तर काय कराल?
SHARES

छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) बोगद्यात (टनेल) नुकत्याच झालेल्या वाहनाला आग लागण्याच्या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने वाहनचालकांसाठी 12 कलमी सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

बुधवारी दुपारी बोगद्यात एका SUV ला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली आणि अनेक वाहनचालकांनी घाबरून वाहने सोडून बाहेर धाव घेतली होती.

या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने प्रतिसाद द्यावा, यासाठी BMC ने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

BMC च्या 12 सुरक्षा सूचना

  • वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा आणि इंजिन बंद करा.

  • वाहनाच्या चाव्या आतच ठेवा.

  • बोगद्यात यू-टर्न किंवा रिव्हर्स घेऊ नका.

  • दर 100 मीटरवर असलेल्या Emergency Telephone System (ETS) द्वारे तातडीने माहिती द्या.

  • शांत राहा आणि Public Address System (PAS) वरील सूचनांचे पालन करा.

  • परिस्थिती सुरक्षित असल्यासच अग्निशामक यंत्राचा वापर करा.

  • भिंतीवरील दिशादर्शक बाणांचा वापर करून दर 300 मीटरवर असलेल्या Cross Passage कडे जा.

  • पॅनिक बटण दाबून क्रॉस पॅसेजचा दरवाजा उघडा आणि शेजारच्या बोगद्यात सुरक्षितपणे प्रवेश करा.

  • नियोजित बाहेर पडण्याच्या मार्गाने सुरक्षित ठिकाणी जा.

  • नियंत्रण कक्ष, बचाव पथक आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.

  • घटनास्थळी परत जाऊ नका किंवा वैयक्तिक सामान आणण्याचा प्रयत्न करू नका.

  • शांत राहा, घाबरून जाऊ नका.

BMC ने स्पष्ट केले आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर आणि वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर Public Address System द्वारे वाहनचालकांना त्यांच्या वाहनांकडे परत जाण्याची सूचना दिली जाईल.

बोगद्यात उपलब्ध सुरक्षा सुविधा

  • दर 100 मीटरवर Emergency Telephone System (ETS)

  • दर 300 मीटरवर Cross Passage

  • संपूर्ण बोगद्यात अग्निशामक यंत्रे

  • Public Address System (PAS)

  • 24x7 CCTV निगराणी

  • 24x7 कंट्रोल रूम मॉनिटरिंग

वाहनचालकांना BMC चे आवाहन

BMC ने वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन करणे, लेन शिस्त पाळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांना पूर्ण सहकार्य करणे असे आवाहन केले आहे. या सूचनांचे पालन केल्यास अपघाताचा धोका कमी होण्यास आणि बचावकार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

आपत्कालीन संपर्क

  • कोस्टल रोड टनेल 24x7 कंट्रोल रूम: 7738989116

  • मुंबई अग्निशमन दल हेल्पलाइन: 101



हेही वाचा

बनावट भरती जाहिराती आणि नोकरीच्या ऑफरपासून सावध राहा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा