Advertisement

अर्जुन कपूरच्या 'संदीप और पिंकी फरार'चा फर्स्ट लूक!


अर्जुन कपूरच्या 'संदीप और पिंकी फरार'चा फर्स्ट लूक!
SHARES

अभिनेता अर्जुन कपूरनं त्याच्या आगामी 'संदीप और पिंकी फरार' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. यामध्ये अर्जुन पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुननं शेअर केलेल्या फोटोत त्याचा गंभीर अंदाज पाहायला मिळत आहे. फोटोत अर्जुन पोलिसाच्या वेशात असून त्याच्या चेहऱ्यावर रागीट भाव आहेत. अर्जुन कपूरनं 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये बिहारी आणि 'मुबारकाँ'मध्ये पंजाबी अशा वेगळ्या धाटणीच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. आता अर्जुन पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 



'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटात तो परिणीती चोप्रासोबत काम करताना दिसणार आहे. या दोन्ही कलाकारांनी २०१२ मध्ये यशराज फिल्मच्या 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येणार आहे. 3 ऑगस्ट २൦१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशा प्रकारे उलथापालथ घडवू शकतात? हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी करत आहेत. त्यांच्यासोबत अर्जुन पहिल्यांदाच काम करत आहे.



हेही वाचा

अबब...या मालिकेचं बजेट ५०० कोटी!

'साजन चले ससुराल'चा सिक्वल लवकरच!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा