Advertisement

'साजन चले ससुराल'चा सिक्वल लवकरच!


'साजन चले ससुराल'चा सिक्वल लवकरच!
SHARES

काही सिनेमे येतात, पण सदैव प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान निर्माण करून जातात. त्यातलाच एक १९९६ साली प्रदर्शित झालेला सिनेमा 'साजन चले ससुराल'. या चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. आता तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा केली आहे. या सिक्वल बरोबरच ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाची घोषणा ही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.



साजन चले ससुराल २’चे  कथालेखन आणि दिग्दर्शन एन. एन. सिद्दीकी करणार आहेत. लवकरच या चित्रपटातील नायक, नायिका तसेच इतर कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा तयार झाली असून सोबत उदय टिकेकर, दाक्षिणात्य अभिनेता गुलू दादा, सोनल माँटेरियो या कलाकारांची निवड चित्रपटासाठी करण्यात आली आहे.



या हिंदी चित्रपटासोबत सिद्दीकी ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एन. एन. सिद्दीकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून ‘राधे मुरारी’ या मराठी चित्रपटात अमित रायन पाटील, गौरव घाटणेकर, उदय टिकेकर, दिपाली सय्यद, किर्ती आडारकर या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत.



‘साजन चले ससुराल’मधील ‘राम नारायण बाजा बजाता...’, ‘दिल जान जिगर तुझ पे निसार...’, ‘बाय बाय मिस गुड नाईट...’ आदी गाणी खूप गाजली होती.



हेही वाचा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा