Advertisement

शाहरूखच्या वाढदिवसासाठी गौरी आणि सुहाना खान अलिबागमध्ये

येत्या 2 नोव्हेंबरला 'रईस' शाहरूख खानचा 52वा वाढदिवस आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याचा 'पार्टी स्पॉट' म्हणजेच त्याचा अलिबागचा बंगला त्याच्या चाहत्यांसाठी 2 तारखेला 'पर्यटन स्थळ' होणार आहे! पण यावर्षी काहीतरी खास आहे. खास यासाठी, की शाहरूखचा हा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याचं कुटुंब म्हणजे पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान एक दिवस आधीच अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.

शाहरूखच्या वाढदिवसासाठी गौरी आणि सुहाना खान अलिबागमध्ये
SHARES

अभिनेता शाहरूख खान आणि सेलिब्रेशन यांचं जणू काही अतूट नातंच आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. किंग खान शाहरूख प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतो. मग कधी ते त्याच्या फिल्मचं लाँचिंग असतं, तर कधी त्याची हॅलोविन पार्टी, कधी त्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो, तर कधी त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्सची सक्सेस पार्टी. पण काहीही झालं, की 'पार्टी तो बनता है बॉस' या अघोषित 'नियमा'नुसार शाहरूख पार्टीमध्ये बिझी होतो. पण यंदा मात्र त्याच्यासाठी त्याची फॅमिली पार्टी आयोजित करत आहे. कसली पार्टी? अहो किंग खानचा 52वा वाढदिवस!



येत्या 2 नोव्हेंबरला 'रईस' शाहरूख खानचा 52वा वाढदिवस आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याचा 'पार्टी स्पॉट' म्हणजेच त्याचा अलिबागचा बंगला त्याच्या चाहत्यांसाठी 2 तारखेला 'पर्यटन स्थळ' होणार आहे! पण यावर्षी काहीतरी खास आहे. खास यासाठी, की शाहरूखचा हा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याचं कुटुंब म्हणजे पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान एक दिवस आधीच अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.



दोनच दिवसांपूर्वी गौरी खान आणि सुहाना खान त्यांच्या प्री हॅलोविन पार्टीमधल्या त्यांच्या सिझलिंग हॉट अंदाजामुळे चर्चेत आल्या होत्या. या पार्टीतला सुहानाचा 'गोल्ड'न लुक तर अजूनही तिच्या चाहत्यांच्या आणि अर्थातच शाहरूखच्या चाहत्यांच्याही लक्षात राहिला आहे. पण आता सुहाना शाहरूखचा 52वा वाढदिवस 'स्पेशल' करण्यासाठी अलिबागमध्ये दाखल झाली आहे.



शाहरूखचा अलिबागमधला हा बंगला त्याच्या कुटुंबीयांसाठी खास आहे. कारण कोणतीही पार्टी असली, तरी शाहरूख आणि त्याची फॅमिली याच बंगल्यावर ती सेलिब्रेट करतं. त्यामुळे आता यावेळी त्याच्या वाढदिवसात या स्पेशल होतं, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे!



हेही वाचा

आजही तिच्या सौंदर्यानं लाखो होतात घायाळ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा