Advertisement

शाहरूख-गौरीच्या हॅलोविन पार्टीत तीच खाऊन गेली भाव!


शाहरूख-गौरीच्या हॅलोविन पार्टीत तीच खाऊन गेली भाव!
SHARES

किंग खान शाहरूख म्हटलं की त्याच्या अवतीभवतीचं वलय, त्याची प्रसिद्धी, त्याचे फॅन फॉलोविंग असं सगळंच आलं. त्यामुळे शाहरूख खान हा आता फक्त एक अभिनेता राहिलेला नसून तो एक ब्रॅण्ड, एक स्वतंत्र इंडस्ट्री झालेला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानपेक्षाही 'खान'दानातलं आणखी एक नाव जोरदार चर्चेत आहे. ते नाव म्हणजे सुहाना खान!



शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी प्री हॅलोविन पार्टी आयोजित केली होती. मुंबईतल्या ताज लँड हॉटेलमध्ये ही पार्टी पार पडली. या पार्टीला बॉलिवुडमधल्या अनेक अभिनेते-दिग्दर्शकांसोबत दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू अर्थात सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली ती शाहरूख खानची मुलगी सुहाना खान!



या पार्टीला सुहाना खान गोल्डन सूट परिधान करुन आली होती. आधीच सुहाना खान तिच्या स्टाईलमुळे, तिच्या ड्रेस चॉईसेसमुळे, तिच्या बोल्ड लुकमुळे नेटीझन्समध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यात गौरी खानने आयोजित केलेल्या या हॅलोविन पार्टीमध्ये सुहाना खान तिच्या लुकमुळे भलतीच फेमस झाली. शिवाय नेटीझन्समध्येही तिच्या पार्टी लुकची चर्चा सुरु झाली आहे!



सुहाना खानसोबतच मलाईका अरोरा, मनीष मल्होत्रा, सीमा खान, अरबाज खान, यश बिर्ला, सुसेन खान, सुशांत सिंग राजपूत, सना खान, इलियाना डिक्रूज, संजय कपूर अशा सेलिब्रिटिंनी उपस्थिती लावली होती. गौरी खानने या पार्टीचे फोटो तिच्या ट्विटरवर शेअर केले आहेत.







हेही वाचा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा