Advertisement

शाहिद - मीरा पहिल्यांदाच कव्हर फोटोत एकत्र!


शाहिद - मीरा पहिल्यांदाच कव्हर फोटोत एकत्र!
SHARES

बॉलीवूडचे बरेच कपल प्रसिद्ध आहेत आणि या प्रसिद्ध जोड्यांमध्ये शाहिद आणि मिराचं नाव आवर्जून घेतलं जातं. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराचं एक फोटोशूट समोर आलं आहे. हे फोटोशूट हॅलो मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी करण्यात आलं होतं. शाहिद आणि मीरा हे आधीही बऱ्याच पार्टी आणि रेड कार्पेटवर एकत्र दिसले आहेत. पण मॅगझिनच्या कव्हर पेजवर मात्र ते पहिल्यांदाच असे पाहायला मिळतायत.



शाहिदने स्वतः त्याच्या सोशल अकाउंटद्वारे हा फोटो शेअर केला आहे. शाहिदने हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या फोटोमध्ये शाहिद काळ्या रंगाच्या पारंपारिक पेहेरावात दिसत आहे आणि त्याची पत्नी मीरा हलक्या हिरव्या रंगाच्या ब्लाउज आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. शाहिदने हा फोटो शेअर केल्यावर लगेचच त्याच्या फॅन्सने त्या दोघांचंही कौतुक केलं आहे.



काही दिवसांपूर्वी मीरा बॉलीवूडमध्ये येणार अशी चर्चाही रंगली होती. पण खुद्द मीराने अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टींना प्रतिसाद दिलेला नाही. या फोटोनंतर मात्र मीरा बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत तर नाही ना? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.



हेही वाचा

शाहरुखच्या सिनेमातले 'हे' डायलॉग्स आजही आहेत फेमस!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा