'83' चित्रपटातील रणबीर-दिपिकाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

भारतीय संघानं २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर देशासाठी पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

रणवीरसोबत दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे. प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील अनेक भूमिकांवरील पडदा आतापर्यंत दूर करण्यात आल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूकदेखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

दीपिका ’83’ या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या फोटोमध्ये दीपिका हुबेहूब रोमी भाटिया यांच्यासारखी दिसत आहे. त्यामुळे दीपिका या भूमिकेसाठी योग्य असल्याचं आता स्पष्ट आहे.

दिपिका आणि रणवीरनं देखील हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर दीपिकानं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे की, देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या क्षणावर आधारित चित्रपटाचा एक भाग होता आले ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहेएका पत्नीची पतीला त्याच्या यशापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गामध्ये भूमिका किती महत्त्वाची असते मी हे स्वत: जवळून पाहिलं आहे. त्यामुळे पतीच्या यशासाठी ज्या महिला स्वत:चं सर्वस्व अर्पण करतात त्या साऱ्या महिलांना 83 हा चित्रपट समर्पित आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण बद्दल कबीर खान म्हणाले की, “मी नेहमीच दीपिकाचा अभूतपूर्व अभिनेत्री म्हणून विचार केला आहे आणि जेव्हा मी रोमी भाटिया यांच्या भूमिकेसाठी कास्टिंग करत होतो तेव्हा मला फक्त तिचं नाव मनात आलं. रोमीकडे एक अतिशय आकर्षक आणि सकारात्मक उर्जा आहे आणि दीपिका पूर्णपणे त्या भूमिकेला न्याय देते. रणवीरसोबत तिची केमिस्ट्री कपिल देव आणि रोमी यांच्यातील संबंध प्रतिबिंबित करण्यासाठी मदत करेल. दीपिका आमच्या चित्रपटाचा अविभाज्य भाग असल्याचा मला आनंद आहे."

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅंटम फिल्म्स यांनी कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनचा '83' सादर केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिका पदुकोण, कबीर खान, विष्णू वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फॅँटम फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फिल्म 83 फिल्म लिमिटेड यांनी केली आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पीव्हीआर पिक्चर्सचे प्रकाशन हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये १० एप्रिल २०२० रोजी होणार आहे.


हेही वाचा

अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका

पुढील बातमी
इतर बातम्या