Advertisement

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका

कंगना रनोट तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा हा दमदार अभिनय तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात एका वेगळ्या पात्रात दिसणार आहे.

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका
SHARES

कंगना रनोटच्या ‘तेजस’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील झाला आहे. या चित्रपटात ती एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार आहे. हा लूक कंगनाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. फोटोसोबत लिहलं आहे की, तेजसमध्ये कंगना एअरफोर्स पायलटच्या रुपात दिसणार आहे.

एअरफोर्स पायलेटच्या भूमिकेत

कंगना रनोट तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा हा दमदार अभिनय तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात एका वेगळ्या पात्रात दिसणार आहे. या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती एअरफोर्सच्या पायलटच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की तिच्या हातात एक हेल्मेट आहे. चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साहानं दिसत आहे. तिच्या मागे एक जेट फाइटर दिसत आहे.


प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला

सोशल मीडियावर अनेकांनी या पोस्टरला पसंती दिली आहे. या फोटोसोबत तिला काही सकारात्मक आणि नकारात्मक अशा काही कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरनी लिहलं आहे की, कंगना रनोटची एक गोष्ट मला आवडते ती म्हणजे फ्लॉप झाली तरी ती साईड अॅक्टरची एखादी भूमिका कधीच नाही करत. तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय, चित्रपट १०० टक्के फ्लॉप होईल. पण वायू सेनेवर आधारीत असल्यानं देशभक्तीचं कार्ड चालेल. तर एकानं तिला सल्ला दिलाय की, तुम्ही फक्त चांगलं काम करा. मेहनत करा. तुम्ही यात चांगले दिसत आहात. तेजस चित्रपटातल्या तुमची भूमिका पाहण्यासाठी वाट पाहायला लागणं माझ्यासाठी कठिण आहे.


कधी प्रदर्शित होणार

तेजसचे दिग्दर्शन सर्वेश मेवाड यांनी केलं आहे. तर रॉनी स्क्रूवाला चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं शूटिंग उन्हाळ्यात सुरू होईल तर एप्रिल २०२१ मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात कंगना फाइटर पायलटची भूमिका साकारणार आहे. २०१६ मध्ये महिलांचा फायटर्सच्या रुपात समावेश करणारी भारतीय वायू सेना देशातील संरक्षण दलात प्रथम होती. या ऐतिहासिक घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे.

कंगनाचा नवा पंगा

कंगनाच्या यापूर्वीच्या 'पंगा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ठिक-ठाक कमाई केली होती. 'पंगा' मध्ये ती एक कबड्डीपटू बनली जी लग्नानंतर आणि मुलानंतर आपल्या कुटुंबात व्यस्त होते. पण त्यानंतर तिचं कुटुंब तिला क्रीडा विश्वात परत जाण्यास प्रेरित करतं. सामान्य स्त्री ते कबड्डीपटु असा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. यात तिचं कुटुंब तिची कशी साथ देतं हे खरंच पाहण्यासारखं आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील कहाणी चित्रपटात खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या इतका पसंतीस उतरला नाही. पण कंगनाच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं


'तेजस' या चित्रपटा व्यतिरिक्त कंगना सध्या ‘तलायवी’ चित्रपटाची तयारी करत आहे. यात ती तामिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव दिवंगत जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.हेही वाचा

महेश मांजरेकरांच्या मुलीचं मराठीत पहिल पाऊल, या चित्रपटातून करणार पदार्पण

'बिग बॉस १३'चा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा