Advertisement

'बिग बॉस १३'चा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला


'बिग बॉस १३'चा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला
SHARES

बिग बॉसच्या १३ व्या सीझनचा विजेता अखेर मिळाला आहे. या सीझनच्या विजेत्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता होती. सिद्धार्थ शुल्का १३ व्या सिझनचा विजेता झाला आहे. सिद्धार्थनं सन्मान चिन्हासोबत दमदार रक्कमही जिंकली आहे. या ट्रॉफीसाठी सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज हे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात होते. अंतिम टप्प्यात सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यात स्पर्धा रंगली होती. बिग बॉस-13 पर्वात अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं जिंकलं आहे.

बिग बॉसच्या घरात पैशांनी भरलेली बॅग ठेवण्यात आली होती. ज्यांना असं वाटतं आपण जिंकू शकत नाही अशांनी या शोमधून एक्झिट घेतल्यास त्यांना १० लाख रुपये मिळतील अशी ऑफर बिग बॉसकडून देण्यात आली होती. ही ऑफर पारसनं स्वीकारत घरातून एक्झिट घेतली. पारस आऊट झाल्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात स्पर्धा रंगली. तर यांच्यातून अंतिम टप्प्यात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज पोहोचले. यावेळी १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली होती. आणि सिद्धार्थ शुल्का आणि आसिम यांना वोट करण्यासाठी प्रेक्षकांना सांगण्यात आलं. त्यावेळी प्रेक्षकांनी सिद्धार्थ शुल्काला भरभरून मतं दिली.

सिद्धार्थ या पर्वात अनेक कारणांनी सर्वाधिक चर्चेत राहिला. मात्र, त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनातही त्यानं स्थान मिळवलं. बिग बॉस फिनालेच्या सेटवर दिग्दर्शक रोहित शेट्टीची विशेष उपस्थिती होती. या शोची चर्चा आणि प्रेक्षकांमधील उत्साह पाहून ४ आठवडे हा शो वाढवण्यात आला होता. त्यानंतर सलमान खान या शोमध्ये होस्ट करणार नाहीत अशाही काही चर्चा समोर आल्या होत्या. मात्र सलमान खानने हा शो सोडणार नसल्याचं म्हणत या चर्चांनाही पूर्णविराम दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा