Advertisement

महेश मांजरेकरांच्या मुलीचं मराठीत पहिल पाऊल, या चित्रपटातून करणार पदार्पण

पांघरुण हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

महेश मांजरेकरांच्या मुलीचं मराठीत पहिल पाऊल, या चित्रपटातून करणार पदार्पण
SHARES

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन येत आहे. पांघरुण हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटातून त्यांची दुसरी मुलगी गौरी इंगवलेनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे

मराठी चित्रपटांमध्ये गौरीनं यापूर्वी बालकलाकार म्हणून काम केलं आहे. पण 'पांघरुण'मध्ये ती मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करियरला खऱ्या अर्थानं सुरुवात होत आहे. एका विधवेची कहाणी असलेल्या 'पांघरुण' या चित्रपटात गौरीसोबत गायक अमोल बावडेकर झळकणार आहे.


गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मामी चित्रपट महोत्सवात पांघरुणचं स्क्रिनिंग पार पडलं होतं. यावेळी या चित्रपटाचा हाऊसफुल शो पार पडला होता. महोत्सवात चित्रपटाविषयी बोलताना मांजरेकर म्हणाले होते, ''पुरुषमंडली स्त्रियांच्या इच्छा पुरवतील. पण त्यांच्या शारिरीक इच्छा असतात हे त्यांना पटतचं नाही. त्या काळातल्या स्त्रीची गोष्ट दाखवणेही गरजेचे होते. त्यावेळच्या स्त्रियांची स्थिती समोर आणणं गरजेचं होतं, आपल्या मातीतला सिनेमा, मातीतली गोष्ट या चित्रपटात आहे.''

महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीजची आहे. येत्या ३ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीमध्ये

Exclusive: 'मास्टर शेफ इंडिया'च्या ६ व्या पर्वाचा विजेता ठरला अबिनास नायक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा