Advertisement

'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीमध्ये

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका आता हिंदीतही प्रसारित करण्यात येणार आहे.

'रात्रीस खेळ चाले' आता हिंदीमध्ये
SHARES

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा मालिकेत माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांवर आधारित या मालिकेला अल्पावधीतच प्रचंड यश मिळाले.

मालिकेत कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही त्यातील व्यक्तिरेखा राज्यातील प्रत्येक घराघरांत लोकप्रिय ठरल्या. सुरुवातीला या मालिकेला विरोध झाला खरा पण तरीही ही मालिका दोनशे भागांच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. हिच मालिका आता हिंदीतही प्रसारित करण्यात येणार आहे.

आता हिंदीमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका डब करण्यात आली आहे. हिंदीत या मालिकेचे ‘रात का खेल है सारा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. मालिका २९ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

सारा-कार्तिकच्या 'लव आज कल'वर प्रेक्षकांचे जबरदस्त मिम्स

'तारक मेहता...' मालिकेशी संबंधित या व्यक्तीचा मृत्यू, शूटिंग देखील थांबवली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा