Advertisement

सारा-कार्तिकच्या 'लव आज कल'वर प्रेक्षकांचे जबरदस्त मिम्स

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या नव्या केमिस्ट्रीमुळे दिग्दर्शक इम्तियाजचा हा प्रयोग बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरत आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.

सारा-कार्तिकच्या 'लव आज कल'वर प्रेक्षकांचे जबरदस्त मिम्स
SHARES

इम्तियाज अलीची आणखी एक रोमँटिक कथा या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. आम्ही बोलत आहोत लव आज कल चित्रपटाबद्दल. अभिनेत्री सारा अली आणि अभिनेता कार्ति आर्यन यांची केमिस्ट्री यात पाहायला मिळत आहे. पण सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या नव्या केमिस्ट्रीमुळे दिग्दर्शक इम्तियाजचा हा प्रयोग बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरत आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा पचनी पडली नाही. लव आज कल या चित्रपटाला प्रेक्षक दोखेडूखी म्हणून बोलत आहेत.

मजेदार मिम्स

सारा अली खान-कार्तिक आर्यनचा लव्ह आज काल या चित्रपटावर प्रेक्षकांनी मजेशीर असे मिम्स शेअर केले आहेत. एका दर्शकानं आलियाची रडणारा व्हिडिओ टाकला आहे. त्यात आलियाचा डायलॉग असतो की, मुझे घर जाना है. तो व्हिडिओ टाकून त्यावर कॅप्शन दिलं आहे की, ऑडियन्स आफ्टर १० मिनिट्स.  

दुसऱ्या फोटोत लिहलं आहे की, ५०० रुपये जास्त घ्या पण हा चित्रपट बंद करा

तिसऱ्या फोटोमध्ये प्रेक्षकानं चित्रपटाची कथा, कथानक, करमणूक या सर्वाच्या शोधात आहोत, असं एक मिम बनवलं आहे

तर एकानं अमिताभ यांचा प्रसिद्ध डायलॉग मिम म्हणून वापरला आहे


सैफच्या 'लव आज कल'ला पसंती

प्रेक्षकांनुसार, सैफ अली खानच्या लव आज कल समोर सारा अली खानची लव आज कल फिकी आहे. ११ वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा लव्ह आज कल ब्लॉकबस्टर म्हणून सिद्ध झाली होती. दिग्दर्शक इम्तियाज अली यांनीच लव आज कलच चित्रपटाचा पहिला भाग बनवला होता.  पण प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटांमध्ये बराच फरक दिसला


प्रेक्षकांची निराशा

इम्तियाज अलीची ही कहाणी प्रेक्षकांचं मन जिंकू शकली नाही, हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट झालं आहे. चाहत्यांनी या चित्रपटाला फ्लॉप म्हटलं आहे. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, कंटाळवाणा आणि डी ग्रेड चित्रपट आहे. चित्रपट पूर्ण बकवास असून तुमचं डोकं फिरवेल. दुसऱ्या एका चाहत्यानं सांगितलं की, आपले पैसे आणि वेळ वाया घालवू नका. लव आज कल हा इम्तियाज अलीचा चांगला चित्रपट नाही


अभिनयाची प्रशंसा

चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना आवडली नसली तरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अभिनयाला लोकांची पसंती मिळाली होती.प्रेक्षकांनी दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

चित्रपट समिक्षकांनुसार, सारा आणि कार्तिकचं लव आज कल पहिल्या दिवशी १२-१३ कोटी कमवू शकते. कारण बर्‍याच शहरांमध्ये चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पूर्ण भरलेली होती. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन व्यतिरिक्त आरुषि शर्मा आणि रणदीप हूडा हे दोन कलाकार देखील चित्रपटात आहेत.

'या' चित्रपटांसोबत स्पर्धा

१४ फेब्रुवारीला सारा अली खान-कार्तिक आर्यनचा लव्ह आज कल या चित्रपटाव्यतिरिक्त साऊथचा 'वर्ल्ड फेमस लव्हर' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. हिंदी प्रेक्षकांमध्ये दक्षिण चित्रपटांची फारशी क्रेझ नसली तरी त्याचा परिणाम विजय देवरकोंडाच्या चित्रपटावर होऊ शकतो. विजय देवरकोंडा स्टारर 'वर्ल्ड फेमस लव्हर'चे आत्तापर्यंत चांगले रीव्ह्यू मिळाले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी जोकर हा हॉलिवूड चित्रपट पुन्हा रिलीज झाला आहे. या चित्रपटानं देखील प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती.हेही वाचा

प्रियंका-निकसाठी 'गुड न्यूज', जोनस कुटुंबात येणार नवा पाहुणा

इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement