Advertisement

प्रियंका-निकसाठी 'गुड न्यूज', जोनस कुटुंबात येणार नवा पाहुणा

आता लवकरच जोनस कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे जोनस कुटुंब आनंदी आहे...

प्रियंका-निकसाठी 'गुड न्यूज', जोनस कुटुंबात येणार नवा पाहुणा
SHARES

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. या दोघांचं लग्न होऊन आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्रियांका गुड न्यूज कधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. अनेकदा तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र नंतर त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. पण आता लवकरच जोनस कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

जोनस कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी

प्रियांकाची जाऊबाई आणि जो जोनासची पत्नी सोफी टर्नर जोनास कुटुंबियांना आनंदाची बातमी देणार आहे. सोफी आणि जो जोनासचं मागच्या वर्षी लग्न झालं होतं. सोफी टर्नर आणि जो जोनास आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. २३ वर्षांची सोफी टर्नर प्रेग्नन्ट आहे. मात्र या कपलनं ही आनंदाची बातमी केवळ कुटुंबातील सदस्यांना आणि मित्र परिवाराला दिली आहे


अधिकृत दुजोरा नाही

परदेशी मीडियाच्या रिपोर्टनुसार, सोफीनं ही बातमी लपवून ठेवली होती. मात्र सोफीच्या प्रेग्नंसीची बातमी कळताच कुटुंबियांना आनंद झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी अवॉर्डसमध्ये सोफी आणि जो एकत्र दिसले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये तिन्ही मिसेस जोनासही उपस्थित होत्या. मात्र सोफी आणि जो च्या जवळच्या व्यक्तींनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.


सोफी टर्नर आणि जो जोनास २०१६ पासून एकमेकाला डेट करत होते. २०१७ ला या दोघांचा साखरपुडा झाला. तर मागच्या वर्षी बिलबोर्ड म्यूजिक अवॉर्डनंतर झालेल्या एका सरप्राईज सेरेमनीमध्ये सोफी आणि जो नं लग्न केलं. त्यानंतर जून २०१९ मध्ये त्यांनी पॅरिसमध्ये जाऊन लग्न केलं. त्यावेळी त्यांचं संपुर्ण कुटुंब उपस्थित होतं.हेही वाचा

इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता होण्यापूर्वी राजकुमार होता 'या' विषयाचा टिचर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा