Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित

'अंग्रेजी मिडियम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अडाजानिया यांनी केलं आहे. हा चित्रपट २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडियम'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

'हिंदी मिडियम' या चित्रपटानंतर अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) पुन्हा एकदा आपल्या शैलीत प्रेक्षकांना भाषेचं ज्ञान देण्यासाठी आला आहे. होय, इरफान खानचा आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ (Angrezi Medium) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अडाजानिया यांनी केलं आहे. हा चित्रपट २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे

मध्यमवर्गीय कुटुंबातील एक वडील, ज्यांची मुलगी परदेशात शिक्षणाचं स्वप्न पाहते. इरफान आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षरश: जीव लावतो. ट्रेलरमध्ये तुम्हाला वडील आणि मुलगी यांच्यातील द्रुढ नातं याशिवाय वडिलांनी मुलीसाठी केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की अंग्रेजी मिडियम चित्रपटामध्ये विनोदासोबतच नात्यांमधील प्रेम पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात इरफान खान राधिका मदनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.

... म्हणून प्रमोशनपासून इरफान लांब

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रेक्षक इरफान खानची अपेक्षा ठेवत होते. पण तब्येत बिघडल्यामुळे इरफाननं चित्रपटाचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. प्रमोशनच्या बदली त्यानं चाहत्यांसाठी एक व्हिडिओ मॅसेज दिला. त्याचा हा व्हॉईस ओव्हर व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या इमोशनल व्हिडीओच्या माध्यमातून इरफान खाननं चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनुपस्थित असल्याचं कारण सांगितलं आहे. त्यानं चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दल सांगितलं. इरफान म्हणाला, "मैं आज आपके साथ हूं भी और नहीं भी. खैर. ये फिल्म अंग्रेजी मीडियम मेरे लिए बहुत खास है. मेरी दिली ख्वाहिश थी कि इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करूं जितने प्यार से हम लोगों ने इसे बनाया है.'


काय म्हणाला इरफान?

'लेकिन मेरे शरीर के भीतर कुछ अनचाहे मेहमान बैठे हुए हैं. उनसे वार्तालाप चल रहा है. देखते हैं किस करवट ऊंट बैठता है. जैसा भी होगा आपको इत्तला कर दी जाएगी. कहावत है कि When life gives you lemons, you make a lemonade. बोलने में अच्छा लगता है लेकिन जब सच में जिंदगी आपके हाथ में नींबू थमाती हैं ना तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है.'


होमी अदजानिया दिग्दर्शित इंग्रजी माध्यमातील चित्रपटात इरफान खान आणि करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याखेरीज राधिका मदन (Radhika Madan), दीपक डोबरियाल, किकू शारदा, डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या हेही आहेत.हेही वाचा

'अंग्रेजी मीडियम' ट्रेलरच्या आधी इरफानचा भावूक व्हिडिओ

'कभी ईद कभी दीवाली'मध्ये सलमानखानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा